आपल्या घरात श्री गणेशाची प्रतिमा किंवा फोटो असेल तर ‘ही’ माहिती अवश्य वाचा…

आपल्या घरात श्री गणेशाची प्रतिमा किंवा फोटो असेल तर ‘ही’ माहिती अवश्य वाचा…

मित्रानो, आपल्या घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला खूप मदत करतात. श्री गणेशाचा आशीर्वाद जर आपल्या वर्ती असेल तर आपल्या घरावर्ती वास्तू दोष निर्माण होत नाही.

मित्रानो, वास्तू दोष म्हणजे काय आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात,आपल्या घरामध्ये विनाकारण पैसे खर्च होतात, पैसे टिकत नाही, लक्ष्मी माता ची कृपा होत नाही, लोक विना कारण एक मेकांशी भांडू लागतात.

तर मित्रानो, अशी जर कारणे होत असतील तर आपल्या घरामध्ये वास्तू दोष आहे असं समजण्यास हरकत नाही. तर मित्रानो हा वास्तू दोष दूर करण्यासाठी गणपती बाप्पा आपल्याला सर्वोतोपरी मदत करतात.

आपल्याला जर आपल्या वास्तू देवतेला प्रसन्न करायचे असेल तर त्या साठी आपण गणपती बाप्पा ची पुज्या अवश्य करायला हवी. गणपतीची आराधना केल्या शिवाय आपण वास्तू देवतेला संतुष्ट करू शकत नाही. चला तर पाहुया, कोणते उपाय आपण करू शकतो.

मित्रांनो पहिली गोष्ट आपल्या मुख्य दरवाजा जो आहे जे मुख्य प्रवेशदार आहे. त्याच्या चौकटीवर बाहेरच्या बाजूने गणपती अवश्य लावा. गणपतीची मूर्ती अवश्य लावावा.आणि त्याच बरोबरीने घरातील आतील बाजूने सुद्धा आपण गणपतीचा फोटो लावावा. अश्या प्रकारे या दोन गणपती बाप्पा ची पाठ एकमेकांना मिळेल.

जर या दोन्ही ची पाठ एकमेकांना मिळत असेल तर आपल्या घरातील वास्तू दोष दूर होतो. आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवताना किव्हा फोटो ठेवताना गणपती बाप्पा हे बसलेल्या अवस्थेत असतील याची काळजी घ्यावी.

यामुळे आपल्या घरातील वास्तू दोष दूर होतील. तसेच तुमच्या ऑफिस मध्ये किव्हा कामाच्या ठिकाणी ज्यावेळी उंची गणपती बाप्पा ची मूर्ती स्थापित करता तेव्हा ती मूर्ती उभी असलेली ठेवा आणि तिचे पाय जमिनीवर स्पर्श करत असतील याची काळजी घ्या. असे केल्याने आपल्या कामामध्ये स्थिरता वाढते आणि कामा मध्ये गती येते.

आपल्या घरामध्ये जो पैसे विनाकारण खरच होत होता तो होत नाही. धंदा वैगेरे सुरळीत चालू लागतो. चढ उतार होत नाहीत. मित्रानो, तुम्ही घरामध्ये किव्हा ऑफिस मध्ये अगदी कोठेही मूर्ती ठेऊ शकता.

त्याबाबत बंधन नाहीत. पण ही एक गोष्ट नक्की लक्ष्यात ठेवा की गणपतीचे मुख कधीही दक्षिण बाजून करू नये. जर दक्षिण ठिकाणी मुख केले तर फायद्या ऐवजी नुकसानच होईल.

ज्या लोकांना वाटतंय आपल्या घरामध्ये सुखशांती असावी, समृद्धी असावी, आपल्या घरामध्ये बरकत असावी, तर अश्या लोकांनी आपल्या घरामध्ये मूर्ती पांढऱ्या रंगाचे सफेद रंगाची मूर्ती स्थापित करावी.

जर ते शक्य नसेल तर अगदी फोटो सुद्धा किव्हा लंबोदराच चित्र सुद्धा लावू शकता. जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्या अपूर्ण असेल आणि ती इच्या पूर्ण व्हावी मनोकामना पूर्ण व्हावी अस जर तुम्हाला वाटत असेल श्री गणेशाची अत्यंत नियमित पुज्या करत चला.

आणि या साठी तुम्ही शेंद्रिय रंगाची गणपतीची आरसना जरूर करा. शेंद्रिय रंगाच्या गणपतीची आरसना केल्याने आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असे हिंदू धर्म,वास्तू शास्त्र सांगतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *