5 महिन्याची प्रे’ग्नं’ट महिलेने करून दाखवली कमाल, पहा केवळ इतक्या मिनिटात पूर्ण केली 10 कीमी ची रेस…

5 महिन्याची प्रे’ग्नं’ट महिलेने करून दाखवली कमाल, पहा केवळ इतक्या मिनिटात पूर्ण केली 10 कीमी ची रेस…

टीसीएस वर्ल्ड 10 च्या बेंगलुरू 2020 मधील प्रेरणादायक कथा समोर आली आहे. ती म्हणजे एका पाच महिन्यांच्या ग’र्भ’वती महिलेने ही रेस अवघ्या 62 मिनिटांत पूर्ण केली आहे. अंकिता गौड अशा या महिलेचे नाव आहे. लवकरच ती आई होणार असून टीसीएस वर्ल्ड वर्ल्ड 10 ही रेस तिने पूर्ण केली.

गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे या रेस मध्ये भाग घेत असलेल्या अंकिताचा असा विश्वास आहे की धावणे हे तिच्यासाठी श्वास घेण्यासारखेच आहे. टीसीएस वर्ल्ड 10 बंगळुरू ही 10 किमी धावण्याची स्पर्धा दर वर्षी घेतली जाते. ती प्रथम 2008 मध्ये आयोजित केले गेली होती.

अंकिता म्हणाली की हे माझ्या साठी खूप खास आहे कारण जवळजवळ गेल्या नऊ वर्षांपासून मी या रेस मध्ये भाग घेत आहे. ती म्हणते नक्कीच कधीकधी आपण जखमी, आजारी किंवा अशा रेस मध्ये भाग करण्यास सक्षम नसता. पण मी गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे धावते आहे, त्यामुळे ते माझ्यासाठी श्वास घेण्यासारखे समान्य गोष्ट आहे.

मग ग’रो’दर आहे म्हणून ही रेस सोडून कसे चालेल. मी माझ्या डॉ’क्टरांना याबद्दल विचारून पूर्ण काळजी घेऊन या रेस मध्ये भाग घेतला होता. मला याचा आनंद आहे की मी रेस पूर्ण केली आहे.

अंकिता व्यवसायाने एक इंजीनियर आहे:- अंकिता पेशाने एक इंजीनियर असून ती 2013 पासून टीसीएस वर्ल्ड 10 केमध्ये भाग घेत आहे. तसेच तिने याआधी बर्लिन, बोस्टन आणि न्यूयॉर्क या ठिकाणी पाच ते सहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये देखील भाग घेतला होता.

यावर्षीच्या स्पर्धेसाठी तिने कशी तयारी केली असे विचारले असता अंकिता म्हणाली की मी हळू हळू नियमितपणे पाच ते आठ किमी धावत होते. ती म्हणाली की ब्रेक घेत घेत मी पळत होते, अर्थातच पाच महिन्यांची ग’रो’दर राहिल्याने माझे श’रीर पूर्वीपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे ही रेस पूर्ण करायला माझ्या नेहमीच्या वेळे पेक्षा मला खूप वेळ लागला पण मी रेस पूर्ण केली आहे.

अंकिता गौरने यासं-दर्भात इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘टीसीएस वर्ल्ड 10 के बेंगलुरू 2020 शर्यतीत 20 आठवड्यांच्या ग’र्भधा’रणेसह भाग घेतला. म्हणून मी ही रेस एक तास आणि 2 मिनिटांत पूर्ण केले. पण मला माझ्या आवडत्या शर्यतीत भाग घेताना खूप आनंद झाला आहे.

आता मी २०२० च्या माझ्या आणि एकमेव पदकाची वाट पाहत आहे. माझ्या दृष्टीने हे प्रत्येक प्रकारे एक विशेष पदक आहे. अंकिता गौरने अशा म’हिलां’साठी एक उदाहरण दिले आहे ज्या ग-र्भधा’रणेदरम्यान व्यायामाबद्दल आणि शा-रीरिक हालचालींबद्दल चिंता करत असतात.

ग’रो’दर असताना धावण्याबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, धावणे खूप सुरक्षित आहे. ग’रो’दर असताना धावणे हा एक चांगला व्यायाम आहे. अमेरिकन कौन्सिल ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार तुम्ही धावपटू असाल तर ते ठीक आहे.

पाच महिन्यांची ग’र्भ’वती असूनही इतक्या लांब शर्यतीत भाग घेण्याबाबत अंकिता म्हणाली, माझ्या डॉक्टरांनी सांगितले की ते पूर्णपणे निरोगी आहे. त्यांनीच मला यात सामील होण्यासाठी आणि पळण्यासाठी प्रोत्साहित केले. पण, त्यांनी मला वेगाने न धावण्याचा सल्ला दिला होता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *