19 वर्षीय तरुणीने 70 वर्षीय म्हताऱ्यासोबत केला प्रेमविवाह, मुलगी म्हणाली; ’70 वर्षीय म्हातारा असूनही तरुणापेक्षा…’

19 वर्षीय तरुणीने 70 वर्षीय म्हताऱ्यासोबत केला प्रेमविवाह, मुलगी म्हणाली; ’70 वर्षीय म्हातारा असूनही तरुणापेक्षा…’

जगात कुठे काय होईल याचा नेम नाही. अनेक विचित्र गोष्टी सोशल मीडियामुळे ऐकायला आणि बघायला मिळत असतात. आज सोशल मीडिया एक मोठं जाळ बनलं आहे आणि त्यामुळेच अशा अनेक गोष्टी आपल्या कानी पडत असतात. आज अशीच एक बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

प्रेम आंधळं असतं हे आपण अनेकदा ऐकलं आणि बघितलं देखील असेल. बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी आपल्यापेक्षा अतिशय कमी वयाच्या मुलींशी लग्न केलं आहे. त्यात सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वायमध्ये 20 वर्षांपेक्षा जास्त अंतर होते आणि तरीही त्यांनी सुखाचा संसार केला.

मात्र अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. एका 19 वर्षीय मुलीने 70 वर्षाच्या म्हताऱ्यासोबत लग्न केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. झालं असं की, मॉर्निग वॉकला निघालेल्या 19 वर्षीय तरुणीचा एका 70 वर्षीय म्हाताऱ्यावर जीव जडला.

दोघांमध्ये काही बोलणे झाले आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. इतक्यावरच न थांबता त्यांनी संसार देखील थाटला आहे. या जोडप्याची प्रेमकहाणी व्हायरल झाली आहे. या जोडप्याचे नाव लियाकत आणि शमाइला असे असून ते दोघे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये राहतात.

70 वर्षीय लियाकत अली हे त्यांच्या प्रेमप्रकरणावर खुलेपणाने बोलत आहेत. लियाकतने पहिल्या भेटीबद्दल सांगितले की, ‘एकदा शमाइला फिरायला जात असताना मी मागून गाणे गुणगुणायला सुरुवात केली. तिने माझ्याकडे वळून पाहिले आणि ती माझ्या प्रेमात पडली.

जेव्हा शमाईलाला विचारलं की लिकायात हे तुझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, तरी तू त्यांच्या प्रेमात कशी काय पडली? तर त्यावर ती म्हणाली की, “इश्‍क में उम्र नहीं देखी जाती, बस हो जात हैं” प्रेमात वय पाहत नसल्याचे स्पष्ट मत 19 वर्षीय शामाईलाने दिले आहे.

दुसरीकडे लियाकत अली यांनीसुद्धा प्रतिक्रिया देत म्हंटले की, हृदय तरुण असायला हवे, वय हा फक्त आकडा आहे. शमाइला सांगते की, घरच्यांनी सुरुवातीला या नात्यावर आक्षेप घेतला होता, पण तिने घरच्यांचे मन वाळविले. घरच्यांचे म्हणणे होते की, तुम्ही दोघे तयार आहात तर आम्ही काय करू शकतो. थोडक्यात काय तर, “मियाँ बीवी राज़ी तो क्या करेगा क़ाज़ी” ही म्हण या दोघांना लागू पडते. या जोडप्याने सांगितले की त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले.

वयाच्या अंतरामुळे चर्चेत आलेल्या या पाकिस्तानी जोडप्याची एका युट्युबरने मुलाखत घेतली आहे. नेटकरींनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. लियाकत यांना विचारले असता, वयात अंतर असलेल्या जोडप्याने लग्न करावे का? त्यावर ते म्हणाले की प्रेमाला आणि लग्नाला वयाचे बंधन नसते. दुसरीकडे, शमाईलाने सांगितले की, प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आयुष्य जगण्याचा अधिकार आहे.

लियाकत म्हणतो की, रोमँटिक होण्यासाठी वयाची अट नसते. प्रत्येक वयाचा स्वतःचा वेगळा प्रणय असतो. लियाकत म्हणाले की, त्याने आयुष्यभर आनंद लुटला आहे. शमायला म्हणते की ती लियाकतसोबत खूप खूश आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *