100 वर्षाच्या आजीला पोलिसांनी केलं अ’ट’क, कारण वाचून सगळेच झाले सुन्न…

100 वर्षाच्या आजीला पोलिसांनी केलं अ’ट’क, कारण वाचून सगळेच झाले सुन्न…

सुरुवातीच्या काळात बातम्या मिळवण्याचे एकमेव स्त्रोत म्हणजे वर्तमानपत्र होते. त्यामुळे जगाच्या पाठीवर कोणतीही महत्त्वाची घटना घडल्यानंतर ती सर्वसामान्य पर्यंत पोहोचायला कमीत कमी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत असे. त्याशिवाय रेडिओ किंवा टेलिव्हिजन याच्या माध्यमातून देखील जागतिक घडामोडी सर्वसामान्य पर्यंत पोहोचत असतात.

त्याला देखील एक ते दोन दिवसांचा कालावधी लागतच असे. परंतु आज इंटरनेटच्या युगामध्ये जगाच्या पाठीवर घडणारी कोणतीही अगदी साधी घटना देखील वाऱ्याच्या वेगाने जगभरात पसरते. इंटरनेटच्या माध्यमातून कुठे काय घडले याबद्दलची माहिती अगदी सर्वसामान्यांपर्यंत देखील पोहोचते.

सोशल मीडिया आणि इंटरनेटचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. त्यामुळे सोशल मीडिया वरती रोज काहीतरी नवीन व्हायरल होतच असतं. यामध्ये कधी एखादी घटना कॅमेरात कैद होऊन त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. तर कोणी एखाद्याने अनुभवलेली विचित्र गोष्ट फोटोंच्या माध्यमातून सर्वांसमोर येते.

सध्या अगदी असाच एक फोटो सगळीकडे वायरल होत आहे. व्हायरल फोटोमध्ये बघायला मिळत आहे की, एक अतिशय वयोवृद्ध अशा आजीबाई व्हीलचेअर वर बसलेल्या असून त्यांनी राणीसारखा वेश परिधान केला आहे. त्यांच्या बाजूला पोलीस असून पोलिसांनी त्या आजीबाईला अटक केली आहे.

इतक्या वयोवृद्ध झाल्यानंतर त्या आजीबाईंनी असा कोणता गुन्हा केला की पोलिसांनी थेट त्यांना अटक केली? असा सवाल फोटो बघणाऱ्यांना पडतो आणि त्यामुळेच हा फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, हा फोटो खोटा नसून खरा आहे. फोटोमधील आजीबाई आपला 100वा वाढदिवस साजरा करत आहेत.

वाढदिवस साजरा करत असतानाच असं काय झालं की पोलिसांनी ही आजीबाईंना अटक केलं? तर खुद्द व्हिक्टोरिया पोलिसांनी संबंधित आजी सोबतचे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या अकाउंट वरून पोस्ट केला आहेत. हे सर्व आपण का करत आहोत,याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे.

फोटोमध्ये दिसत आहे की पोलिसांनी अगदी आरामात हतकडी लावून आजीबाईंना अटक केली आहे. ही जगातील सर्वात वेगळी बर्थडे पार्टी ठरली. त्याचं झालं असं की, जीन बिकेंटन नावाच्या आज्जींच्या 100 व्या वाढदिवसाच्या वेळी हा सर्व प्रकार घडला. विशेष म्हणजे ही गोष्ट खुद्द आजीच्याच इच्छेने झाली.

त्यांनी मोठ्या कालावधीपर्यंत लष्करामध्ये परिचारिका म्हणून काम केले. या पूर्ण कालावधीमध्ये त्यांनी अनेकांची मन जिंकली. आपल्या सेवाभाव आणि शांत स्वभावाने त्यांना कायमच प्रेम मिळाले. मात्र आयुष्यात एकदा तरी आपल्याला अटक व्हावी अशी त्यांची इच्छा होती.

परंतु उत्तम कारकीर्द आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जीन यांना अटक कोणत्या कारणाने होणार? त्यामुळे त्यांची ती इच्छा अपूर्णच राहिली. ती इच्छा विक्टोरिया पोलिसांनी त्यांच्या 100 व्या वाढदिवशी पूर्ण केली आणि त्यांना अगदी सन्मानाने अटक केली. आजींचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्हिक्टोरिया पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, या फोटोंवर सोशल मीडियावरती भन्नाट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published.