10 वर्षांची मुलगी झाली करोडपती, वयाच्या 15 व्या वर्षी निवृत्तीसाठी आहे तयार!

ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पिक्सी कर्टिसची स्वतःची कंपनी आहे. तिचे उत्पन्न हे कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. वयाच्या १० व्या वर्षी अनेक मुलांना शाळेतून कधी घरी पोहोचतो आणि टीव्ही पाहतो, असे होते. मात्र या जगामध्ये एक मुलगी अशी आहे की, ती वयाच्या दहाव्या वर्षी कोट्यवधी रुपये कमावते.
या वयात इतके यश मिळवले आहे, की ती पुढील 5 वर्षांत निवृत्त देखील होऊ शकते वयाच्या १८ व्या वर्षी जिथे लोक आपलं करियर ठरवत असतात, तिथे या मुलीने घरात बसून खाऊ शकेल एवढी कमाई केली अशी माहिती आहे. हे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित झाले असाल, चला तर मग जाणून घेऊ या, ही मुलगी असे काय करते?
वयाच्या 10 व्या वर्षी कोणी काय विचार करू शकतो. सामान्य मुले खेळण्यासाठी आणि अभ्यास करत असतात. मात्र अपवादात्मक स्थितीत काही मुलं या वयात आपलं करिअर ठरवत असतात. पण एक मुलगी अशी आहे जी या वयात करोडोंची मालकिन आहे. पिक्सी कर्टिस नावाच्या या मुलीने लहान वयातच आपला व्यवसाय तयार केला आहे.
मुलीने एका महिन्यात करोडो कमवले आणि तिला आता तिच्या भविष्याची चिंता नाही. ही मुलगी 15 व्या वर्षी निवृत्त होऊ शकते, असे सांगण्यात येते. ऑस्ट्रेलियात राहणारी पिक्सी कर्टिस सध्या प्राथमिक शाळेत शिकत आहे. तिची Pixie’s Fidgets नावाची कंपनी आहे.यीतून ती करोडोंची कमाई करत आहे. या कामात तिची आई रॉक्सी यादेखील मदत करत असतात.
त्या स्वतः एक यशस्वी जनसंपर्क व्यवस्थापक आहेत. आई रॉक्सी आणि मुलगी पिक्सी यांनी मे महिन्यात खेळण्यांचा व्यवसाय सुरू केला. त्याची सर्व खेळणी ४८ तासांत विकली गेली आणि हे त्याचे पहिले यश होते. रॉक्सी ने सांगितले की, ‘पहिल्या महिन्यात कंपनीची उलाढाल $200,000 किंवा 10 दशलक्ष पेक्षा जास्त होती.’
यानंतर, पिक्सीच्या कंपनीने हेअर ऍक्सेसरी ब्रँड देखील तयार केला. त्याचे नाव पिक्सी बोज होते. खेळणी आणि केसांच्या अॅक्सेसरीजचा ब्रँड पिक्सीज पिक्स नावाच्या मदर कंपनीच्या अंतर्गत येतो. हे खेळणी, कपडे आणि उपकरणे विकते. या सर्वांना 10 वर्षांच्या पिक्सीची मान्यता आहे. पिक्सीची आई रॉक्सी स्वतःही एक यशस्वी जनसंपर्क व्यवस्थापक आहे आणि मुलांना महागड्या भेटवस्तू आणि कपडे देऊन चर्चेत राहिली आहे.
पिक्सी वयाच्या १५ व्या वर्षी निवृत्त होऊ शकते
पिक्सीसाठी सर्व काही केले आहे. जेणेकरून ती वयाच्या 15 व्या वर्षी निवृत्त होऊ शकेल. ती म्हणते की, इतक्या लहान वयात पिक्सीमध्ये व्यवसाय करण्याची इच्छा होती आणि माझ्या मदतीने तिला यश मिळाले. रॉक्सी स्वत: स्वेटी बेट्टी पीआर नावाचा एक यशस्वी व्यवसाय चालवते आणि यामध्ये तिचा पतीही तिला पाठिंबा देतो. तिच्या महागड्या आणि राजेशाही जीवनशैलीमुळे ती अनेकदा चर्चेत असते.