४२ वर्षांपासून लता दीदीची सावली बनून सोबत असायची ‘ही’ व्यक्ती..हा चेहरा विसरून चालणार नाही…

४२ वर्षांपासून लता दीदीची सावली बनून सोबत असायची ‘ही’ व्यक्ती..हा चेहरा विसरून चालणार नाही…

कोणत्याही व्यक्तीचे नि’ध’न झाले की, त्या व्यक्तीच्या कुटुंबियांवर आभाळच को’सळते. मात्र काही व्यक्ती त्यांच्या कुटुंबीयांसोबतच अनेकांना देखील दुःखी करून जातात, तर काहीजण संपूर्ण जगाला दुःख देतात. अशाच काही व्यक्तींपैकी एक लता मंगेशकर देखील होत्या. त्यांच्या नि’ध’नाच्या बातमीने संपूर्ण देशवासीयांना मोठा ध’क्का दिला आहे.

लता दीदीच्या जाण्यामुळे केवळ आपल्या देशातच नाही तर, जगभरातील संगीत सृष्टीमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. म्हणून तर म्हणतात की, संगीताला कोणत्याहि सीमा नसतात. त्यांच्या बहिणी सोबत संपूर्ण देशच दुःखाच्या शोकसागरात बु’डाला आहे. मात्र अशा वेळी आपण कायम काही खास व्यक्तींकडे दुर्लक्ष करतो.

किंबहुना आपल्याकडून त्याच्याकडे नकळत दुर्लक्ष करण्यात येतं. त्या व्यक्ती म्हणजे आपल्या घरात काम करणारी मंडळी. आपल्या घरात काम करत असताना ते देखील आपल्या घराचा एक भाग बनलेले असतात. त्यांच्या मनात देखील आपल्या बद्दल एक मायेची आणि आपुलकीची भावना निर्माण झालेलीच असते. आणि आपल्या घरातील व्यक्तीच्या जाण्यामुळं त्यांना देखील अतोनात वे’दना होतात.

अगदी असंच काही झालं आहे, लता दीदींसोबत सावली बनून राहणाऱ्या विमलताई यांच्याबद्दल. लता दीदींच्या जाण्याची बातमी समोर आली तेव्हा, विमलताईंच्या डोळ्यांतील अश्रू थांबतच नव्हते. रडून रडून त्यांनी अक्षरशः भान सोडले होते. माघील ४२ वर्षांपासून त्या लता दीदीची सेवा करत होत्या. विमलताई यांचे अश्रू बघून अनेकांना त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावू लागली.

आपल्या आणि लता दीदींच्या बॉण्डिंग बद्दल बोलताना विमलताई म्हणाल्या,’असा एक पण दिवस नसेल जेव्हा मी लता दीदीना काय हवं-नको ते विचारलं नाही. लता दीदीसोबतच माझा दिवस सुरु होत असे आणि त्याच्यासोबत संपत असे. त्यांच्या घरात कोणती वस्तू कुठे ठेवायची हे मला चांगलं माहित होत.

त्यांना पाहिजे ते, घर, त्याची रूम आवरून देण्यातच माझा दिवस संपायचा. को’रो’नाच्या काळात देखील आम्ही एकमेकींना साथ दिली. लता दीदी माझ्या साठी खूप काही होत्या. त्या लता मंगेशकर होत्या, मात्र माझ्यासाठी केवळ दीदी. एकदा मी घरून त्याच्यासाठी लाडू घेऊन आले होते.

त्या ते खातील किंवा नाही याची चिंता मला सतावत असताना, त्यांनी डब्ब्यातून लाडू घेतले पण आणि खाल्ले पण. त्यांना मी बनवलेली लाडू खूप आवडले. अधून-मधून त्या माझ्याकडून लाडू बनवून घेत असे. आता मी कोणासाठी लाडू बनवणार?’ असा प्रश्न विमलताईंनी विचारला, मात्र त्याच उत्तर कोणाकडेच नव्हतं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.