३० वर्षांच्या बहिणीने केले आपल्याच ६० वर्षांच्या भावासोबत लग्न! केवळ करोडोंच्या प्रॉपर्टीसाठी तिने लग्नानंतर काही वर्षातच..

आजकाल वेगवेगळ्या आणि विचित्र अशा प्रेमकथा समोर येत आहेत. मात्र त्यामध्ये काही अगदी विकृत घटना समोर येतात. अशा वेळी त्याला प्रेम म्हणावं की विक्षीप्तपणा हेच समजत नाही. कधी कधी या प्रेमाला कोणतीच मर्यादा राहत नाही. मात्र काही मर्यादा असतात ज्यांचं पालन केलंच पाहिजे.
काही नाते असे असतात, ज्यांचा आदर केला गेलाच पाहिजे. मात्र असे होत नाही, आणि आपल्या वासनेला प्रेमाचे नाव देत काही लोक, सर्व मर्यादा ओलांडतात आणि त्यानंतर त्याचे भीषण परिणाम भोगावे लागतात. अशा अनैतिक नात्याचे परिणाम खूपच भयानक ठरतात आणि त्यामुळे अनेकांचे आयुष्य देखील उध्वस्त होते.
मात्र अनेकजण आपल्या प्रेमाला किंवा नात्याला कोण काय म्हणेल याची पर्वा देखील करत नाहीत. नात्यांची कोणतीच मर्यादा न पाळता हे लोकं स्वतःच्या मर्जीनुसार नवीन नाते प्रस्थापित करतात. अगदी असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे, एका तरुणीने चक्क आपल्या भावासोबतच लग्न केले आहे.
आपल्या भारतीय परंपरेनुसार बहीण-भावामध्ये लग्न केलं जात नाही. बहीण-भावाचं नातं अतूट विश्वासाचे आणि सर्वात पवित्र असं मानलं जातं. मात्र परदेशात अनेक ठिकाणी, असा कोणताही समज नाहीये. अनेक ठिकाणी बहीण भावांच्या नात्याला पवित्र असं समजलं नाही जात. त्यातूनच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका बहिणीने आपल्याच भावासोबत लग्न केलं आहे.
नातं आणि दोघांमधील वयाचा मुद्दा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित महिला ही 30 वर्षाची आहे. मात्र तिचा भाऊ वयाने तिच्यापेक्षा दुपट्टीने मोठा आहे. आजवर आपण बायको आणि नवऱ्यामध्ये जास्तीत जास्त 10 ते 12 वर्षांचं अंतर असेल असं पाहिलं आहे. त्याहून अधिक अंतर असेल तर ते नाते नक्कीच चर्चेचा मुद्दा ठरतो.
असंच सध्या ब्राझीलमधील एका कपलच्या बाबतीत घडलं आहे. या दोघांच्या मधील वयामध्ये तब्बल 29 वर्षांचे अंतर आहे. संबंधित महिलेचं नाव हे डेबोरा असून तिच्या पतीचं अँडरसन आहे. हे दोघे एकमेकांचे बहीण-भाऊ आहेत. डेबोरा ही अँडरसनची चुलत बहीण आहे. हे कपल ब्राझीलमधील आहे. आता दोघांच्या लग्नाला आता 6 वर्षे झाली आहेत.
त्या दोघांची पहिली भेट झाल्यानंतर चार दिवस एकत्रपणे घालवले. त्यानंतर तीन महिन्यातच दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिथल्या लोकांनी लग्न केल्यावर डेबोराला खूप टोमणे मारले. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर आता देखील तिला सर्वजण असे बोलतात की, फक्त आणि फक्त पैशासाठी तिने अँडरसनसोबत लग्न केलं आहे.
यावर बोलताना डेबेरा म्हणते की, अँडरसन हा वयाने मोठा असल्याने मला लोकांनी खूप डिवचलं आणि टोमणे मारले. कारण अँडरसन माझा चुलत भाऊ लागतो. पण माझं पहिल्या भेटीतच त्याच्यावर प्रेम झालं होतं. आमचं नातं हटके आहे, पण खूप खास देखील आहे.’