१४ वर्षाखालील ‘हे’ दोन्ही बहीण-भाऊ महिन्याला कमावतात लाखो रुपये, त्यांचे कारनामे बघून चकित व्हाल..

काही वर्षांपूर्वी आपण “आम्ही छोटेसे बहिण-भाऊ उद्याला मोठे होऊ” हे गीत ऐकले असेल. हे गीत खर्या अर्थाने खरे करून दाखवले आहे, अमेरिकेच्या दोन लहानग्या बहिण भावांनी आज आम्ही आपल्याला याबाबतची माहिती देणार आहोत. अमेरिकेत राहणार्या एका 14 वर्षाच्या भावाने व त्याच्या नऊ वर्षाच्या बहिणीने लाखो रुपये कमवून सर्वत्र चर्चा करून दिली आहे.
हे बहिण-भाऊ मूळचे भारतीय असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत राहत आहेत. आपल्याकडे लहान मुले अनेकदा उचापती करत असल्याचे आपण पाहिले आहे. लहान मुल म्हणजे खोड्या करण्याचा त्यांचा छंद असतो. मात्र, काही मुले लहान वयातच वेगवेगळे प्रयोग करत असतात. अनेक लहान मुलांना घरी गरिबी असल्यामुळे लहान वयातच कामाला लागावे लागते. कुठे हॉटेलवर काम करावे लागते.
मात्र, सरकार देखील अशा लहान मुलांसाठी वेगवेगळ्या योजना आखत असते. या मुलांसाठी ते मानधन व पैसे देखील देत असतात. मात्र यातील काही जण यशस्वी होतात, तर काहीजण हे वाईट संगतीला लागतात. तर सधन घरातील मुले देखील वाईट वळणाला लागल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, काही जण त्यांच्या वेळेचा सदुपयोग चांगल्या प्रकारे करत असतात.
अमेरिकेत राहणाऱ्या ईशान ठक्कर व त्याची बहीण आनन्या यांनी आपल्या बुद्धीने लाखो रुपये सध्या कमावलेले आहे. ते सध्या चर्चेत आलेले आहेत. ईशान हा केवळ 14 वर्षाचा आहे, तर अनन्या ही केवळ नऊ वर्षाची आहे. ईशान याला मोठे होऊन यूपीएमध्ये मेडिसिनमध्ये शिक्षण घ्यायचे आहे. तर आनन्या ही देखील त्याच्या भावाला साथ देत असते. या दोघांनी बिटकॉइन मध्ये लाखो रुपये कमवण्याचे समोर आलेले आहे.
ईशान अमेरिकेच्या टेक्सास शहरातील सध्या हायस्कूल मध्ये शिकतो, असे असताना त्याला संगणकाचे वेड लागले आणि संगणकाच्या माध्यमातून त्याने बिट कॉइन करन्सीच्या माध्यमातून लाखो रुपये सध्या कमवलेले आहेत. संगणक ग्राफिक कडे त्याचा कल होता. मायनिंग च्या माध्यमातून त्यांनी लाख रुपये कमावले. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने स्वतःची कंपनी स्थापन केली होती.
2021 मध्ये त्याने बिटकॉइन आणि क्रिप्टो करेंसीच्या माध्यमातून लाखो रुपये कमावण्याचे समोर आलेले आहे. 2021 मध्ये त्याने सुरुवातीला तीन हजार डॉलर कमावले होते. सुरुवातीला त्याची गुंतवणूक ही अतिशय छोटी होती. मात्र, त्याने त्या माध्यमातून उत्तुंग भरारी मारली आहे. सध्या त्याने 27 लाख रुपये कमावले असे सांगण्यात येते. हे अमेरिकेचे एकूण मूल्य 36 हजार डॉलर होते. त्याची बहीण देखील त्याला यामध्ये साथ देत असते.
क्रिप्टो करेंसी म्हणजे काय?
हाय पावर कम्प्युटरचा वापर करून क्रिप्टोग्राफीफ इक्वेशन सोडवुन मिळवलेल्या प्रक्रियेला क्र्यप्टॉकरेन्सी असे म्हणतात. यामध्ये सध्या ईशान याममध्ये चांगलाच रमला आहे. या माध्यमातून त्याने लाखो रुपये कमावले आहेत. सध्या त्याचे सोशल मीडिया मध्ये खूप कौतुक होत आहे.