हॉटेल किंवा ट्रायल रूम मध्ये लपवलेला छुपा कॅमेरा अशाप्रकारे ओळखा..

हॉटेल किंवा ट्रायल रूम मध्ये लपवलेला छुपा कॅमेरा अशाप्रकारे ओळखा..

हॉटेल रूममध्ये किंवा ट्रायल रूममध्ये कॅमेरा असण्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. अशा बर्याच वेगवेगळ्या घ’टना उ’घडकीस आल्या आहेत. काही वेळा बा’थरूम’मध्ये लपलेले कॅ’मेरे असल्याच्या बातम्या आल्या आहेत. जे अत्यंत चिं’ताजनक आहे. आपल्या गोपनीयतेसह अशाप्रकारचे गों’धळ करणे चांगले नाही.

हॉटेल रुम, लेडीज बा’थरु’म किंवा कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुममध्ये छुपा कॅमेरा किंवा रे’कॉर्डिंग डि’व्हाईस सा’पडल्याचे अनेक प्रकारही उ’घडकीस आले आहेत. अशामध्ये तुम्हीही या प्र’कारांची शि’कार होऊ नये यासाठी तुम्हाला अधिक स’तर्क आणि सा’वधान राहण्याची आवश्यकता आहे.

तर आपणसुद्धा हॉटेल इत्यादी ठिकाणी राहत असल्यास किंवा वापर करत असल्यास काळजी घ्या. आपल्या खोलीत लपलेला कॅमेरा आहे की नाही हे शोधण्याचे बरेच मार्ग आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी काही असे उपाय घेऊन आलो आहोत ज्याद्वारे तुम्हाला लपलेले कॅमेरे मिळतील, जेणेकरून तुम्ही कधीही अशा प्रकारच्या घटनेला ब’ळी पडणार नाही.

१. रुममध्ये प्रवेश करताच हे करा:- जेव्हा तुम्ही हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश करता तेव्हा रुमच्या अशा जागा बघा जिथून रुम मधील बेड आणि संपूर्ण रुम चांगल्या पद्धतीने दिसत असेल. कारण या त्याच जागा असतात जिथे कॅमेरा लपवून त्याद्वारे व्हि’डीओ रे’कॉर्डिंग केले जाऊ शकते. मग त्यामध्ये रुममधील आरसा असो, सजावटीच्या वस्तू असोत किंवा कपाट वगैरे वस्तू असतील. या गोष्टी सुरुवातीलाच नक्की तपासून बघा.

२. इलेक्ट्रिक वायर बघा:- रुममध्ये लपवण्यात आलेला कॅमेरा चालण्यासाठी त्याला विद्युत पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रुम मधील सर्व इलेक्ट्रिक साधनांची तपासणी अवश्य करा. मग त्यात रुममध्ये दिसणारी अशी कुठली तार का असेना जिची काहीच गरज नसते किंवा अशी लाईट जी सतत चालूबंद होत असेल. त्यांनतर एकदा रुममधील सगळ्या लाईट्स व्यवस्थित बंद करून रुममध्ये कुठे लेन्स तर चमकत नाही ना याची खात्री करा.

३. आरशावर बोट ठेवून तपासण्याची युक्ती:- तुम्ही जेव्हा कधी कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम किंवा चेंजिंग रुममध्ये कपडे ट्रायल करण्यासाठी जाल तेव्हा सगळ्यात आधी या ट्रिकचा वापर करा. त्यासाठी आपल्या बोटाचे नख ट्रायल रुममधील आरशावर टेकवा आणि तुमच्या बोटाचे नख आणि त्याचे प्रतिबिंब यात गॅप तर नाही ना ते बघा.

असे करण्याने तुम्ही जाणून घेऊ शकता की ट्रायल रुममध्ये लावलेल्या आरशाच्या मागे कुठला कॅमेरा तर लावलेला नाही. जर नख आणि त्याचे प्रतिबिंब यात कसलाच गॅप दिसत नसेल तर मग त्याचा अर्थ असा की आरशाच्या दुसऱ्या बाजूला कॅमेरा लपवला असण्याची शक्यता आहे.

४. स्मार्टफोनच्या मदतीने छुपा कॅमेरा शोधा:- छुपा कॅमेरा शोधण्यासाठी तुम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये Hidden Camera Detector, Glint Finder, Spy Cam Finder सारखी ऍप्लिकेशन्स इन्स्टॉल करु शकता. याशिवाय जर ट्रायल रुम किंवा हॉटेल रुम मधून तुम्ही कुणाला फोन लावला आणि बोलत असताना कुठला अडथळा येतोय का ते तपासून बघा.

जर रुममध्ये कुठला कॅमेरा असेल तर तो फोन सिग्नल कॅप्चर करेल आणि फोनमध्ये खरखर आवाज येईल. सोबतच स्मार्टफोनचा वायफाय ऑन करून स्कॅन केल्यास Available Device मध्ये कॅमेरा डिव्हाईस सापडू शकते.

यावर अतिशय चांगला असा उपाय म्हणजे तुम्ही रूम मध्ये गेल्या नंतर तुमच्या मोबाईलच नेटवर्क गायब झाले, किंवा ज्या नेटवर्कच्या काड्या असतात त्या कमी जास्त झाल्या किंवा रूमच्या बाहेर रेंज येतेय पण रूमच्या आत आल्यावर रेंज जात असेल तर मित्रांनो लक्षात घ्या त्या रूम मध्ये 100 टक्के छुपा कॅमेरा बसवलेला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *