‘हे’ 10 घरगुती उपाय करून कायमचा पळवून लावा खोकला, पहा 5 वा उपाय केल्यास परत कधीच येणार नाही खोकला…

आजकाल हॉटेलमध्ये जेवण करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच सकाळी उठल्या उठल्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. उदाहरणात अपचनाचा त्रास देखील होतो. तसेच तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने अनेकांना खोकल्याचा त्रास देखील होतो. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये आज असे दहा घरगुती उपाय सांगणार आहोत की, ज्यांनी आपला खोकला बरा होऊ शकतो. तर मग जाणून घेऊया कुठले आहेत उपाय..
१. गुळण्या : तुम्हाला खोकला येत असेल तर गरम पाणी करून त्यामध्ये मीठ टाकावे. मिठाच्या गुळण्या कराव्यात. काही प्रमाणात खोकला कमी होतो. तसेच त्यांचे टॉन्सिल्स वाढलेली आहे, त्यांच्यासाठी देखील हा प्रभावी उपाय मानला होतो.
२.कोमट पाणी: जर तुम्हाला खोकल्याची वारंवार उबळ येत असेल तर कोमट पाणी वारंवार प्यावे. याने खोकला काही प्रमाणात कमी होऊ शकतो. > ३.लवंग व मध : खोकल्याची मोठ्या प्रमाणात उबळ येत असेल तर आपण चार-पाच लवंग घेऊन त्याची पूड करावी. त्यामध्ये तीन चमचे मध टाकावा आणि हे मिश्रण घ्यावे. या मिश्रणामुळे आपला खोकला कमी होऊ शकतो.
४.धूम्रपान : जर आपल्या ला धुम्रपान करण्याची सवय असेल तर ही सवय तातडीने बंद करा. यामुळे तुमचा खोकला बरा होऊ शकतो. > ५.आहार: जर आपण बाहेर मोठ्या प्रमाणात जेवण करत असाल तर ते तातडीने बंद करावे. बाहेरचे तळलेले पदार्थ, फरसाण, चिवडा हा कमी प्रमाणात खावा. यामुळे देखील तुमचा खोकला वाढू शकतो. तसेच तळलेले पदार्थाचा तवंग तुमच्या घशात अडकून खोकला वाढू शकतो.
६.गोळ्या : जर तुम्ही खोकल्याच्या गोळ्या वारंवार घेत असाल, तर त्या देखील बंद करा. यामुळे देखील तुमचा खोकला वाढू शकतो. मेंथोल युक्त गोळ्या घेतल्याने खोकला हा वाढू शकतो. > ७. ज्येष्ठमध : जर तुम्हाला रात्री खोकल्याची उबळ येत असेल तर ज्येष्ठमध तोंडात धरावा. यामुळे तुमची उबळ काही प्रमाणात कमी होत खोकला बंद होतो.
८. सुंठ साखर : जर आपल्याला खोकला मोठ्या प्रमाणात येत असेल तर करून सुंठ बारीक करून त्यामध्ये बारीक साखर टाकावी व हे मिश्रण घेत राहावे. यामुळे देखील खोकला बंद होऊ शकते. > ९.चहा: जर आपल्याला खोकला मोठ्या प्रमाणात येत असेल तर तुळशीची पाने लवंग, गवती चहा हे उकळून त्याचा चहा प्यावा. यामुळे देखील खोकला काही प्रमाणात कमी होऊ शकतो. > १०. अडुळसा : जर आपल्याला खोकल्याची मोठी ढास लागली असेल तर आपण अडुळशाचा पानांचा काढा घेऊ शकता. यामुळे तुमचा खोकला नियंत्रण देऊ शकतो.