हिवाळ्यात मुळा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, हृदयरोग किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी नवसंजीवनी, वाचा सविस्तर…

हिवाळ्यात मुळा खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, हृदयरोग किंवा कोलेस्ट्रॉल रुग्णांसाठी नवसंजीवनी, वाचा सविस्तर…

मुळा ही भारतातील एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून मुळा एक प्रकारचा कंद आहे. तसेच बारा महिने उपलब्ध असणारी ही भाजी आहे. आरोग्यासाठी मुळा खुपच लाभदायी आहे. मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो असे तज्ज्ञ सांगतात.

आयुर्वेदात मुळा बद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. मुळे खाल्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यापासून रक्तदाब, हृदयरोग यापासून आपला बचाव होण्यास मदत होते. चला तर आज आपण जाणून घेवू मुळा खाण्याचे आश्चर्यकारक फा-यदे.

१. आपल्या सलाद मध्ये असलेला मुळा हा प्रथिने, जीवनसत्व-ए, व्हिटॅमिन-बी, सी, लोह, आयोडीन, कॅल्शियम, सल्फर, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, क्लोरीन यांचा एक उत्तम स्त्रोत आहे. हे सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला तंदुरस्त ठेवतात.

२. मुळा आपली भूक वाढवतो आणि आपल्या पाचक प्रणालीला अधिक चांगले कार्य करण्यास प्रवृत्त करतो. रिकाम्या पोटी मुळाचे तुकडे सेवन करणे गॅसच्या समस्येमध्ये अधिक फा-यदेशीर आहे. जेवणापूर्वी मुळा आपले अन्न पचविण्यात मुळा मदत करतो.

३. मुळा लठ्ठ रुग्णांसाठी खूप फा-यदेशीर आहे. या साठी मुळाच्या रसामधेय लिंबू आणि मीठ मिसळा व याचे सेवन करा. त्याच्या सेवनाने हळूहळू चरबी कमी होतो. मुळाचा रस पिणे हे दम्याच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते.

४. मुळा रस आणि मुळा हे किडनीच्या समस्यांसाठी एक रामबाण उपाय आहेत. मुळाच्या रसामध्ये मीठ मिसळून पिल्याने मुतखडा देखील नष्ट होतात. यासाठी किमान ७ दिवस याचे सेवन करा.

५. मुळाचा रस मूत्र रोगात किंवा त्याच्याशी सं-बंधित कोणत्याही प्रकारच्या समस्येमध्ये फा-यदेशीर आहे. हे मूत्रमार्गामध्ये येणाऱ्या हानिकारक घटकांना काढून संक्रमणाच्या प्रसारास प्रतिबंध करते आणि जळजळ, सूज आणि इतर समस्या देखील दूर करते.

६. दातदुखीची समस्या किंवा पिवळसरपणा दूर करण्यासाठी, मुळाच्या छोट्या तुकड्यांमध्ये लिंबाचा रस घालावा किंवा थोडावेळ त्याने गुळण्या करून थुंकून टाका. अशा प्रकारे, दातांचा पिवळसरपणा कमी होईल. मुळाचा रसाने दात स्वच्छ धुवूनही दात मजबूत होतील.

७. जर तुम्हाला झोप येत नसेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे निद्रानाशच्या समस्येपासून सुटका होण्यासाठी खूप उपयुक्त आहे, मुळा झोपेला प्रेरित करत असते.

८. मुळाच्या पानांचा रस त्वचेवर लावा आणि आपली त्वचा निखळ तजेलदार आणि मऊ बनवा. तसेच तुम्ही याची पेस्ट बनवूनही लावू शकता. हे कोरड्या त्वचेला आराम देईल आणि त्वचेला मऊ बनवेल.

९. रक्ताभिसरण नियंत्रित करण्यात मुळा सगळ्यात प्रभावी आहे. मुळा हा वाईट कोलेस्टेरॉल कमी करतो आणि रक्तदाब नियंत्रित करतो. यामुळे हृद्यरोगाच्या रुग्णांसाठी मुळा सर्वोत्तम औषध आहे.

१०. मुळ्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळते यामुळे तुमची हाडे मजबूत करण्यासही मदत होते. हे खाल्ल्याने सांधेदुखी आणि सूज देखील कमी होते.

११. मुळा यकृत आणि पोटासाठी खूप चांगला आहे आणि हे यकृत मधून विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील कार्य करते. याचा अर्थ असा की हे रक्त शुद्ध करते आणि विषारी पदार्थ नष्ट करते. कावीळच्या उपचारात मुळा खूप उपयुक्त आहे कारण ते रक्तातील बिलीरुबिन काढून टाकते आणि त्याचे उत्पादन पातळी सामान्य ठेवते.

१२. तसेच मुळा खाल्याने लाल रक्तपेशी नष्ट होण्यापासून देखील प्रतिबंधित करते. दररोज सकाळी झोपेतून उठल्यान्मान्त्र कच्चा मुळा खाल्ल्याने काही दिवसात कावीळ बरी होते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *