हिवाळ्यात एक मुळा खाण्याचे आहेत अनेक फायदे, हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात,फक्त असा करा वापर..

हिवाळ्यात एक मुळा खाण्याचे आहेत अनेक फायदे, हृदय विकारांसह BP सुद्धा राहील नियंत्रणात,फक्त असा करा वापर..

बदलत्या ऋतूनुसार आपल्या खाण्यामध्ये देखील बदल केले पाहिजेत असं तज्ञांच मत असते. प्रत्येक ऋतूमध्ये, मुख्य असं फळ किंवा भाजी असते, ज्याच्या खाण्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तर, सुरुवातीच्या काळात देखील जसा ऋतू बदलत असे, तसे खाण्याच्या सवयी देखील बदलत असत. उन्हाळा असेल तर जास्तीत जास्त पाणी थंड पदार्थ खाल्ले जातात.

त्याचबरोबर सॅलड मध्ये, कांदा, काकडी आणि कोशिंबीरचे प्रमाण वाढते. तर पावसाळ्यात, शक्यतो सॅलड कमी खा असा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात मात्र, खवय्येगिरांची पर्वणीच असते. हिवाळ्यात उष्ण पदार्थ, खास करून डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट्स, सोबत काही खमंग पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळा आला की, आजही प्रत्येकाच्या घरात वेगवेगळे खमंग आणि पौष्टिक पदार्थ बनतात. असं म्हणलं जात की, या वातावरणामध्ये पचन चांगले होते. म्हणून तर हिवाळ्यात अनेकांचे वजन जरा जास्त वाढलेलं आपल्याला बघायला मिळते. याच काही पौष्टिक पदार्थांसोबत आता रोज एका भाजीचा समावेश देखील आपल्या आहारामध्ये कराल तर अनेक फायदे होतील.

आपल्यापैकी अनेकांना मुळा आवडत नाही. कोणाला त्याचा वास आवडत नाही, तर कोणाला त्याची चव आवडत नाही. मात्र हाच मुळा अनेक आजारांवर रामबाण ठरू शकतो. मुळा केवळ एक चांगली भाजीच नाहीये तर, त्यामध्ये असलेले घटक, प्रतिकारशक्ती, र’क्तदा’ब आणि र’क्तवाहि’न्यांसाठी देखील खूप फायदेशीर ठरते.

बऱ्याच लोकांना मुळा सलाडमध्ये खायला आवडतो. व्हिटॅमिन सी चे प्रमाण मुळ्यामध्ये अधिक असते. त्यामुळे थंडीमध्ये, सर्दी-खोकल्याच्या त्रासापासून नक्कीच संरक्षण होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे कामसुद्धा मुळा करतो. शरीरातील सूज, जळजळ कमी करण्यासाठी आणि वृद्धत्व रोखण्यासाठी देखील मुळा कारगर ठरतो.

म्हणून तर अनेक, स्किन स्पेशलिस्ट मुळा खाण्याचा सल्ला देतात. यामुळे त्वचा ताजी दिसते. मुळ्यामधून शरीराला आवश्यक असलेल्या पोटॅशियमचा योग्य पुरवठा होतो. त्यामुळे र’क्तदाब नियंत्रित राहतो. तुम्हाला हायपरटेन्शनची सम’स्या असेल तर, तुमच्या आहारात मुळ्याचा अवश्य समावेश करा. आयुर्वेद सांगते की, मुळ्यात रक्तावर थंडावा देण्याचा प्रभाव असतो.

मुळा अँथोसायनिन्सचा देखील चांगला स्रोत समजला जातो. अँथोसायनिन्समुळे आपले हृ’दय योग्यरित्या कार्य करू शकते. म्हणून, रोज मुळा खाल्ल्याने हृ’दयवि’काराचा धो’का चांगलाच कमी होतो. फॉलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्सनेचे प्रमाण देखील मुळ्यामधे भरपूर असते. मुळा र’क्तातील ऑ’क्सिजनचा पुरवठा वाढवण्याचे महत्वपूर्ण काम करतो.

मुळ्यामध्ये फायबरचे प्रमाण देखील चांगले आढळते. जे लोक रोज सलाडच्या म्हणून मुळा खातात त्यांच्या शरीरामध्ये फायबरची कमतरता कधीही होत नाही. फायबरचे प्रमाण योग्य असेल तर, पचनक्रिया व्यवस्थित काम करते. याशिवाय मुळा यकृत आणि गाल मू’त्राशयाचे र’क्षण करते. मुळ्यातील व्हिटॅमिन सी, फॉस्फरस तुमच्या त्वचेला नवीन जीवनदान देऊ शकतात.

मुरूम, कोरडी त्वचा या सम’स्या मुळ्याच्या सेवनाने कमी होतात. त्यामुळे तुमची त्वचा तर चमकतेचं शिवाय, तुमचेच के’स देखील उत्तम होतात. मुळ्याचे पाणी केसांना लावले तर, कोंड्याची स’स्या दूर होते. मुळा व्हिटॅमिन ई, ए, सी, बी 6 आणि के नं समृद्ध असा आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, झिंक, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असतात.आपल्या शरीराला आतून निरोगी बनवण्यासाठी हि सर्व पोषकतत्व महत्वाची ठरतात.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *