हाऊसफुल्ल! ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवरही फडकवला झेंडा, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

हाऊसफुल्ल! ‘पावनखिंड’ने बॉक्स ऑफिसवरही फडकवला झेंडा, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

बहुचर्चित पावनखिंड चित्रपटाने चित्रपट गृहात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर देखील सगळेकडे पावनखिंड चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या मराठी चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं चित्र आहे.

अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागला आहे. पहिल्याच दिवशी 1530 शोजसह ‘पावनखिंड’ चित्रपटगहात दाखल झाला. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला 1910 शो मिळाले. याचा परिणाम म्हणजे अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाच्या नावे अनेक रेकॉर्ड नोंदवले आहेत. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून सैराटचा बोलबाला आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाने अक्षरशः हिंदीमधेही आपला डंका वाजवला होता, त्यामुळे याची जास्त चर्चा होताना दिसते. मात्र यामध्ये पावनखिंड कुठेच कमी पडताना दिसत नाही.

‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गेल्या शुक्रवारी सिनेमाने 1.15 कोटींचा गल्ला जमवला. शनिवारी या चित्रपटाने 2.05 कोटींची कमाई केली आणि रविवारी तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 3 कोटींवर पोहोचला. चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्ये एकूण 6 कोटींचा बिझनेस केला आहे.

विशेष म्हणजे, नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’नंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘पावनखिंड’ हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. 2016 साली नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच विकेंडमध्ये 11.5 कोटींचा पल्ला गाठला होता.

‘पावनखिंड’ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. को’रो’ना नियमामुळे 50 टक्के क्षमतेनेच चित्रपटगृह सुरू असली तरी अवघ्या तीन दिवसातच ‘पावनखिंड’ने 6.03 कोटींचा बिझनेस केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.