हरनाझ संधू मिस युनिव्हर्स झाल्यामुळे पुन्हा एकदा कंगनाने शेअर केली पोस्ट..म्हणाली..

हरनाझ संधू मिस युनिव्हर्स झाल्यामुळे पुन्हा एकदा कंगनाने शेअर केली पोस्ट..म्हणाली..

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावत कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच प्रकाशझोतात असते. कुठेही कोणतीही घटना झाली की, त्याबद्दल करून आपले मत नक्की व्यक्त करते. अनेकांना तिचे मत पटत नाही मात्र, तिला समर्थन करणारा देखील चाहतावर्ग आहे. हे अनेकांना ती निर्भिड आणि परखडपणे मत मांडणार एक अभिनेत्री वाटते.

कंगनाने आजपर्यंत अनेक वा’दग्र’स्त विधाने दिली आहेत. त्यामुळे तिला खूप वेळा ट्रो’ल देखील व्हावे लागले. मात्र कंगना राणावतने कधी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही. अलीकडे काही दिवसांपूर्वी तिला देशातील मोठा मानाचा नागरी पुरस्कार देण्यात आला. ‘पद्मश्री’ या पुरस्काराने कंगना राणावत गौरवान्वित करण्यात आले.

मात्र तिच्या वा’दग्र’स्त विधानांमुळे अनेकांनी, तो पुरस्कार तिच्याकडून काढून घेण्याची मागणी देखील केली. नुकतच विकी कौशल आणि कटरीना कैफ यांचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी देखील, ‘आता समाज बदलत आहे आणि तो बदल सर्वजण स्वीकारत आहेत’ अशी पोस्ट त्या दोघांच्या लग्नावरती कंगना राणावतने शेअर केली होती.

आता पुन्हा एकदा कंगना राणावतने इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. आज सकाळपासून सगळीकडे एका तरुणीचे देशभरात कौतुक होत आहे. हरनाज कौर संधूने 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षाला पूर्णविराम देत जगातील सर्वात मानाचा किताब ‘मिस युनिव्हर्स’ पटकावला आहे. संपूर्ण देशात तिचेच कौतुक सुरू आहे.

सन 2000 मध्ये लारा दत्ताने हा किताब जिंकून देशाची मान उंचावली होती. त्यानंतर मात्र कोणत्याही मिस इंडियाला, हा मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यात यश आले नव्हते. आता तोच किताब हरनाज संधूने जिंकला आहे. सगळीकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाच्या नवख्या मिस युनिव्हर्सला कंगना राणावतने देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या या पोस्टमध्ये कंगनाने हरनाझचा फोटो शेअर करत ‘खरोखर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. अभिनंद हरनाझ संधू’ असं कॅप्शन दिले आहे. बॉलीवूड मधील अनेक इतर सेलिब्रिटीज देखील तिला शुभेच्छा देत आहेत. अनेक सेलेब्रिटीजने, मिस युनिव्हर्स म्हणून तिचे नाव घोषित केलेला क्षण आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर स्टोरी म्हणून ठेवला आहे.

हरनाज संधूचा जन्म चंदीगडच्या एका मध्यमवर्गीय शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची तिला प्रचंड आवड आहे. हरनाजने अवघ्या १७व्या वर्षी म्हणजेच किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. २०१७ मध्ये तिने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. २०१८ मध्ये, तिला ‘मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८’चा अवॉर्ड मिळाला होता.

त्याच दरम्यान तिने दोन पंजाबी सिनेमामध्ये देखील काम केले होते. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाजने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. त्यामध्ये तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. या वर्षी सप्टेंबरमध्ये हरनाजने ‘मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१’चा मुकुट पटकावला. सध्या ती पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *