स्वतःच हल्ला करून फसला ! पहा माकडाने किंग कोब्राला पार रडवलं, Video पाहून तुम्हालाही येईल सापाची दया…

इंटरनेटवर रोज वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडिया वरती जंगलातील प्राण्यांचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज सध्या सोशल मीडिया वरती तुफान व्हायरल होत आहेत. प्राण्यांचे व्हिडियोज खास करून अनेकजण मोठ्या कौतुहलाने बघतात.
कधी त्यांचे खास गमतीशीर व्हिडियोज तर कधी प्राण्याचे लढाई करतानाचे व्हिडियोज सोशल मीडियावर प्रचंड आवडीचे ठरत आहेत. खास करून प्राण्यांच्या लढाईचे विलक्षण असे व्हिडिओज समोर आले आहेत. काहीच दिवसांपूर्वी एका हत्तीवर सिंहणीने कसा हल्ला केला त्याचा चित्त थरारक व्हिडिओ सोशल मीडिया वरती धुमाकूळ घालत होता.
त्यानंतर झेब्रा आणि सिंहाची लढाई व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना पाहायला मिळाली. जंगलातील थरारक युद्धाचे हे व्हिडिओ मात्र यूजर्स मध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. आता नुकतंच असाच एक लढाईचा व्हिडियो समोर आला आहे. हा व्हिडियो बघून अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नाग आणि माकड या दोन प्राण्यांच्या लढाईचा हा व्हिडियो आहे. हा व्हिडियो बघून सर्वचजण थक्क झाले आहेत. नागाच्या किंवा सापाच्या पुढे कोणता प्राणी शक्तिशाली ठरेल, असा प्रश्न जरा पडला तर त्याच उत्तर या व्हिडियोमधून मिळतो. या व्हिडियोमध्ये माकडाचे चातुर्य बघणं सर्वचजण अवाक झाले आहेत.
व्हायरल होणारा व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की, एक माकड आपलं निवांत बसलं आहे आणि एक किंग कोब्रा नागोबा आपला फणा उंचावून त्याच्या दिशेने जातात. तसं तर किंग कोब्रा हा सर्वात धोकादायक सापांपैकी एक मानला जातो. एकदा जर किंग कोब्राने आपल्या भक्ष्याला चावा घेतला की त्याच्यापासून निसटणे जवळपास अशक्यच होते.
मात्र व्हिडियोमध्ये दिसणारं माकड चांगलाच शक्तिशाली सिद्ध होत आहे. त्याचा आत्मविश्वास इतका जास्त आहे की, त्यानं त्या किंग कोब्राला पार धु धु धुवून काढलं आहे. कधी त्याचा फणा पकडून तरी कधी शेपटी खेचून माकडाने किंग कोब्राला असा काही धडा शिकवला ते पाहून खरच माकडही हुशारमाणसांचे पूर्वज आहेत हे सिद्ध होईल. दरम्यान, हा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या व्हिडियोवर टीका देखील केली आहे. हा व्हिडियो ठरवून केला असल्याच समजत आहे, असं सर्वजण बोलत आहेत.