‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील शालिनीच्या खऱ्या नवऱ्याला पहा, करतो हे काम

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधील शालिनीच्या खऱ्या नवऱ्याला पहा, करतो हे काम

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका आता प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. मात्र, अनेक प्रेक्षक या मालिकेवर टीका देखील करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांची कहाणी दाखवण्यात आली आहे.

मालिकेमध्ये वर्षा उसगावकर यांनी देखील काम केले आहे. त्यांची माई ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे, तर या मालिकेमध्ये नकारात्मक भूमिका करणाऱ्या शालिनी वाहिनीचे खरे नाव माधवी निमकर असे आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे.

माधवी निमकर हिचा जन्म 17 मे रोजी पुण्यातील खोपोली येथे झाला. तिला व्यायामाची खूप आवड आहे. त्यामुळे ती स्वतःला फिट ठेवत असते. तसेच फिटनेस टिप्स प्रेक्षकांना देत असते. सोशल मीडिया न्यूज चॅनल वर ती योग गुरू म्हणून ओळखल्या जाते. मनोरंजन क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी शूटिंग पाहण्यासाठी माधवी निमकर बहिणीसोबत मुंबईला नेहमी येत असे.

म्हणूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली. 2007 साली गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलावण्यात आलं होते. यामुळे तिचा आत्मविश्‍वास वाढला. आत्मविश्वास वाढल्याने माधवी निमकर हिने अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. 2000 रूपये सोबत घेऊन तिने मुंबईचा प्रवास धरला. तिने अनेक एकांकिका नाटकांमध्ये काम केले आहे.

स्टार प्रवाहची स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत तिला काम करण्याची संधी मिळाली आणि नकारात्मक भूमिकेमुळे माधवी निमकर घराघरात पोहोचली. त्यानंतर अवघाची हा संसार, जावई विकत घेणे आहे ,हम तो तेरे आशिक है या मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची चमक दाखवली.

मालिकांप्रमाणेच माधवी निमकर हिने संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करून भागले, धावाधाव काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच अनेक नाटकांमध्ये तिने काम केलं. महारथी हे त्यांचे गाजलेले नाटक आहे. 2010 साली तिचा विवाह विक्रांत कुलकर्णी याच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे.

माधवी निमकर हिच्या मुलाचे नाव रुबेन असे आहे, तर माधवी हिचा पती हा खूप मोठा व्यावसायिक असून तो पर्यटन क्षेत्राशी संबंधित काम करत असल्याचे सांगण्यात येते, तर आपल्याला माधवी निमकर आवडते का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.