‘सिंघम’ मधल्या शिवा ची बायको आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, पहा जोडीचे फोटो

‘सिंघम’ मधल्या शिवा ची बायको आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, पहा जोडीचे फोटो

मराठी चित्रपट सृष्टी मधून किंवा मराठी बोलणारे अनेक अभिनेते हे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चांगले नाव कमवत आहेत. काही वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांनी विनोदी अभिनेता म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चांगलेच नाव कमावले. त्याचबरोबर जुन्या काळामध्ये रमेश देव यांनी देखील हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला.

मराठमोळी माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी यासारख्या अभिनेत्रींनी देखील हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये नाव कमावले. आता देखील गेल्या काही वर्षात अनेक असे अभिनेते आहेत की ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टी तर गाजवून सोडलीच. मात्र हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील त्यांनी जबरदस्त असा अभिनय केला.

आज आम्ही आपल्याला सिंघम चित्रपटामध्ये काम करणारे अभिनेता अशोक समर्थ याच्या विषयी माहिती देणार आहोत. अशोक समर्थ हा अतिशय डॅशिंग असा अभिनेता आहे. सिंघम चित्रपटात त्याने अतिशय जबरदस्त काम केले. अजय देवगन च्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटामध्ये त्याने साकारलेला शिवा सगळ्यांनाच प्रचंड आवडला होता.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. आता देखील आगामी काळामध्ये त्याच्याकडे काही चित्रपट असून काही चित्रपटाचे तो लेखन देखील करणार असल्याचे कळते. या चित्रपटाचे नाव देखील त्याने घोषित केले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत त्याची पत्नी देखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या वर्षीच्या सुमारास अशोक समर्थ याचे लग्न झाले. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतात. सिंघम चित्रपटामध्ये शिवा ही भूमिका साकारणारा अभिनेता आपल्याला आठवत असेल. या अभिनेत्याचे नाव अशोक समर्थ असे आहे. सिंघम चित्रपटामध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले होते.

सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. अशोक समर्थ याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याच्या बायकोचे नाव शितल पाठक असे आहे. 2013 मध्ये आलेल्या ट्राफिक जाम या चित्रपटांमध्ये अशोक याची शितल पाठक हिच्याशी ओळख झाली त्यानंतर या दोघांनी लग्न केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका ही खूपच हिट ठरली होती.

शितल हिने या आधी कृपासिंधू या चित्रपटात काम केले आहे. मंडळी तुमच्यासाठी काही पण, चेहरा, तात्या विंचू लगे रहो, गाव तंटामुक्त, सामर्थ्य बायगो बाय यासारख्या चित्रपटात शितल हिने काम केले. आता अशोक समर्थ आणि शीतल पाठक दोघेही एका चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे लेखन अशोक समर्थ यांनी केले असून या चित्रपटाचे नाव जननी असे आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.