सारा तेंडुलकर नाही तर आता ‘या’ दिगग्ज अभिनेत्याच्या हॉट मुलीला डेट करतोय शुभमन गिल, एकत्र फोटो लीक झाल्याने झाला खुलासा…

सारा तेंडुलकर नाही तर आता ‘या’ दिगग्ज अभिनेत्याच्या हॉट मुलीला डेट करतोय शुभमन गिल, एकत्र फोटो लीक झाल्याने झाला खुलासा…

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या नात्याबद्दल खूप चर्चेत होता. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघेही अनेकदा एकमेकांचे कौतुक करताना दिसले.

पण हे दोघे कधीही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत. मीडियाने त्यांच्या अफेअरची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले. त्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनीही मीडियावर बोलबाला केला. मात्र आता शुभमण एका बॉलीवूड अभिनेत्री सोबत हातात हात घालून डिनर डेट वरून बाहेर येत असल्याचा स्पॉट झाला आहे.

त्यानंतर सगळीकडेच आता त्याच्या नात्याची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्री सोबत शुभमण नात्यात असल्याचं बोललं जात आहे. आता त्यातच शुभ आणि सारा अली खानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे सगळीकडे त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान सारा अली खान काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यनला डेट करत होती.

परंतु त्यांचा लव आज कल2 हा चित्रपट फ्लॉप झाला आणि त्यांचं नातं देखील संपुष्टात आलं. बॉलिवूडची बबली अभिनेत्री सारा अली खानचे नाव सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अशाप्रकारे सोशल मीडिया वरती चर्चेत येण्याची सारा अली खानची ही पहिली वेळ नाही. विशेष म्हणजे सारा अली खान आपल्या प्रोफेशनल लाईफ पेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत असते.

कॉफी विथ करण मध्ये मध्यंतरी तिने केलेले विधान चांगलेच व्हायरल झाले होते. यावेळी तिने अनेक बोल्ड स्टेटमेंट देत सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. लग्न आणि प्रेम याबद्दलचे तिचे विचार ऐकून अनेकांना मोठा झटका बसला. आणि आता पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्य साठीच सारा अली खान चर्चेत आली आहे.

कॉफी विथ करण च्या भागांमध्ये करनणे वारंवार विचारून देखील तिने आपण सध्या कोणाला भेट करत आहोत याबद्दल काहीच बोलले नाही. परंतु तो बॉलीवूड मधला नाही एवढं मात्र तिने सांगितलं होतं. आणि आता तिचे काही फोटोज सोशल मीडिया वरती वायरल होत आहेत. विशेष म्हणजे या फोटोमध्ये ती कोण्या बॉलीवूड अभिनेत्या सोबत नाही तर एका दिग्गज क्रिकेटर सोबत दिसत आहे.

त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान अलीकडेच क्रिकेटर शुभमन गिलसोबत डिनर करताना दिसली होती, जिथे दोघे एकमेकांचा हात धरताना दिसले होते. अभिनेत्री सारा अली खान तरुण क्रिकेटर शुभमन गिलसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटवर दिसली.

सारा अली खान आणि शुभमन एकत्र जेवण करतानाचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. आता तिच्या आणि शुभमनच्या नात्यामुळे, सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. शुभमनने त्या साराला सोडून स्वत:पेक्षा 3 वर्षांनी मोठ्या असलेल्या या साराचा हात हातात घेतल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *