सानिया मिर्झाला करायचंय बॉलिवूडमधील ‘या’ चॉकलेट बॉय सोबत लग्न, म्हणाली शोएबच्या आधी…

सानिया मिर्झाला करायचंय बॉलिवूडमधील ‘या’ चॉकलेट बॉय सोबत लग्न, म्हणाली शोएबच्या आधी…

टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या चर्चेत आहे. सानिया पती शोएब मलिकपासून घटस्फोट घेत असल्याची चर्चा आहे. सानियाच्या या गूढ पोस्टनंतर स्टार कपलच्या घटस्फो’टाच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. मात्र या वृत्तांवर या जोडप्याने आतापर्यंत मौन बाळगले आहे.

शोएबसोबत रिलेशनशिप असताना सानिया बराच काळ चर्चेत होती यात शंका नाही. दरम्यान, सानियाच्या लग्नाआधीच अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाचे नाव बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरसोबतही जोडले गेले होते.

सानिया आणि शाहिदच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. शाहिद आणि सानिया एकमेकांना डेट करत असल्याची अफवा पसरली होती. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याच्या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पण जेव्हा सानिया मिर्झा करण जोहरच्या टॉक शो कॉफी विथ करणच्या सीझन 5 मध्ये आली तेव्हा तिने तिच्या आणि शाहिदच्या डेटिंगच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली.

करण जोहरने सानिया मिर्झाला विचारले – असे कसे होऊ शकते की, बोलीवूडमधील कोणत्याच अभिनेत्याने तुला कधीच डेटिंगसाठी विचारले नाही? या प्रश्नावर सानिया मिर्झाने उत्तर दिले होते- माझ्यासोबत असे कधीच घडले नाही. सानियाच्या उत्तरावर करणने पुढे विचारले – तुझ्या आणि शाहिदच्या अफेअरबद्दलही चर्चा झाली होती.

त्यांच्यात काही तथ्य होते का? यावर सानियाने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ती म्हणाली होता – मला आठवत नाही, ही गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे. माझ्या बाबतीत असे काहीही झाले नाही. तुम्हाला तस ऐकायला आलं असलं तरी निव्वळ योगायोग समजा.

यानंतर, शोच्या रॅपिड फायर राउंडमध्ये, जेव्हा सानिया मिर्झाला विचारण्यात आले की तिला रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरसोबत कोणाशी लग्न, हुकअप आणि किल करायला आवडेल? यावर सानिया म्हणाली होती – ती रणवीरसोबत हुकअप करेल, रणबीर कपूरशी लग्न करेल आणि शाहिद कपूरला मारेल.

आता सानियाच्या घटस्फो’टांच्या बातम्यांमध्ये हाच जुना व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सानिया मिर्झाबद्दल बोलायचे झाले तर तिने क्रीडा जगतात मोठे नाव कमावले आहे. खेळासोबतच सानिया तिच्या ग्लॅमरस अवतारामुळेही चर्चेत असते. सानियाचे सुंदर फोटो आणि लूक व्हायरल होत आहेत. सध्या सानिया पती शोएब मलिकसोबत घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *