साडीवर खुलल रिंकू राजगुरूचं सौंदर्य, घातलं एक दोरीचं ब्लाउज, पहा दिसतेय कमालीची सुंदर आणि बोल्ड…

साडीवर खुलल रिंकू राजगुरूचं सौंदर्य, घातलं एक दोरीचं ब्लाउज, पहा दिसतेय कमालीची सुंदर आणि बोल्ड…

माघील काही दिवसांपासून मराठी अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. अनेक मराठमोळ्या अभिनेत्री बॉलीवूड सिनेमामध्ये झळकल्या आहेत. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर सारख्या अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.

केवळ अभिनेत्रीच नाही तर, अनेक मराठमोळ्या अभिनेत्यांनी देखील बॉलीवूडमध्ये आपला जम बसवला आहे. केवळ काही मराठी कलाकारांना प्रसिद्धी आणि लोकप्रियता कमवण्यासाठी कमालीचा वेळ लागला, तर काही कलाकारांना लवकरच यश मिळाले. अशाच काही कलाकारांपैकी एक तुमची आवडती रिंकू राजगुरू देखील आहे.

आज देखील सैराट सिनेमाचे नाव जरी ऐकले तरीही, आर्ची आणि परशा डोळ्यासमोर येतात. किशोरवयातील या प्रेमकथेने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशातील जनतेला वेडं लावलं होत. या चित्रपटात आर्ची आणि परशा म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा रोमॅन्स सिनेमा यशस्वी होण्याचं प्रमुख कारण ठरलं, असं म्हणलं तरी चुकीच ठरणार नाही.

या चित्रपटातून रिंकू आणि आकाश दोघांना एक खास ओळख मिळाली. आपल्या पहिल्याच सिनेमात त्या दोघांनी दमदार अभिनय करत मोठा चाहतावर्ग निर्माण केला. आणि दिवसेंदिवस त्याच्या फॅन्सच्या संख्येत भरच पडत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झुंडने तर त्यांना बॉलीवूडमध्ये देखील एका मानाचं स्थान मिळवून दिल आहे.

या चित्रपटामध्ये सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे खास कौतुक करण्यात आले. खास करून रिंकूने आपल्या अभिनयानं अनेकांना चकितच केले. तस बघता रिंकू कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर रिंकूचा भला-मोठा चाहतावर्ग आहे. नेहमीच ती सोशल मीडियावर आपले नवं नवीन फोटोज शेअर करत असते. तिच्या दिलखेच अदांवर चाहते घायाळ होतात.

आजवर रिंकूने आपले अनेक ग्लॅमरस लूकमधील फोटोज शेअर केले आहेत. मात्र नुकतंच तिने एका साडीच्या ब्रँड साठो फोटोशूट केलं आहे. त्याचेच फोटोज आपल्या सोशल मीडियावरून तिने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रिंकूच सौंदर्य अजूनच खुलून आलं आहे. यंदाही रिंकू खूपच क्युट दिसत आहे. रिंकूने यापूर्वी देखील अनेकवेळा आपले साडीवरचे फोटोज शेअर केले आहेत.

मात्र यावेळी शेअर केलेल्या फोटोंची गोष्ट थोडी वेगळी आहे. सिंगल स्ट्रीप ब्लाउज आणि त्यावर साडी असं बोल्ड पण पारंपरिक लूकमधील तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. गालावरची खळी, साजेसा मेकअप, त्यावर प्रमाणात ज्वेलरी आणि साडी यामुळे रिंकू या फोटोमध्ये उठून दिसत आहे.

तिच्या या फोटोवर चाहत्यांच्या नजराच हटत नाहीयेत. ‘एक हुनर है चूप रेहाना का.. इक ऐब है केह देणे का..’ असं कॅप्शन देत तिने हे फोटोज शेअर केले आहेत. सध्या ट्रेंडिंग मध्ये असणाऱ्या ऑर्गनझा मटेरियलच्या साड्या या फोटोमध्ये रिंकूने घातल्या आहेत. चाहत्यांनी या फोटोवर पसंती दर्शवत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.