साऊथ सिनेसृष्टीवर कोसळला दुःखाचा डोंगर ! ६०० हुन जास्त चित्रपटात काम करण्याऱ्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याचं हृ’दयविकाराच्या झट’क्याने निधन..

मनोरंजनसृष्टी मधून सध्या एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. काहीच दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने फक्त मराठीच नाही तर बॉलीवूड मध्ये देखील कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली होती. गेली अनेक वर्ष ते बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीमध्ये सक्रिय होते.
दरम्यान, नुकतेच २० वर्षीय अभिनेत्री तुनिशा शर्माने गळफास लावून आत्महत्या केल्याने चाहते असूनही धसक्यात आहेत. सोशल मीडियावर देखील तुनीषाचे अनेक फोटो आणि विडिओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे अजूनही यामधून बाहेर निघणे चाहत्यांना अवघड जात असले तरी आणखी एक धक्कादाक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे.
ही बातमी साऊथ सिने सृष्टीमधून असून एका जेष्ठ अभिनेत्याचे हृदयविकराच्या झटक्याने निधन झाले आहे. तेलगू स्टार चलपति राव यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षाचे होते. चलपती राव यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये विनोदी आणि खलनायकाच्या भूमिका केल्या. त्यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आणि निर्मात्याला रविवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चालपती राव यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांची मुलगी अमेरिकेतून परतल्यानंतर 28 डिसेंबर रोजी अत्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहे.
ते म्हणाले की, पार्थिव रवी बाबू यांच्या घरी ठेवण्यात येईल, जेथे सेलिब्रिटी आणि चाहते त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यास येतील. चालपती राव यांच्या निधनाची बातमी पसरताच त्यांचे सहकारी आणि इंडस्ट्रीतील चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केले. अभिनेता आणि निर्माते नंदामुरी कल्याण राम यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून चालपती राव यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला.
चालपती राव यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत ‘कलियुग कृष्णदू’, ‘कडापरेदम्मा’, ‘जगन्नाटकम’, ‘पेलांटे नुरेला पंता’, ‘प्रेसिडेंटिगरी अल्लुडू’, ‘अर्धारात्री हात्यालू’ आणि ‘रक्तम चिंदिना रात्रि’ या चित्रपटांची निर्मिती झाली. अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.
त्यांचा मुलगा रवी बाबू याने एक उत्तम अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्याच्या निधनावर टॉलिवूडमधील अनेक दिग्ग्ज अभिनेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.