सांधे आणि स्नायू च्या दुखण्यातून मुक्ती मिळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा म्हातारपणात देखील तुमचा…

सांधे आणि स्नायू च्या दुखण्यातून मुक्ती मिळण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, पहा म्हातारपणात देखील तुमचा…

सांधे आणि स्नायूंच्या दुखण्याचा त्रास साधारणपणे म्हातारपणात होत असतो. पण योग्य आहार आणि व्यायामाची शरीराला सवय नसेल तर हा त्रास कोणत्याही वयात होवू शकतो. मात्र शरीराकडे दुर्लक्ष झाल्याने अशाप्रकारचा त्रास होवू शकतो. शिवाय हे दुखणे खूपच असह्य असते. चालण-फिरणे अवघड होऊन बसते.

काहीवेळा तर बसल्या जागेवरून उठतादेखील येत नाही. अशा त्रासदायक आजाराने अनेकजण त्रस्त असतात. यासाठी काही उपाय घरच्याघरी देखील करता येऊ शकतात. ज्यामुळे दुखण्यापासून आराम मिळू शकतो. याआधी आपण सांधेदुखी च्या कारणांबद्दल चर्चा करू.

सांधेदुखीचे कारणे:-

– वाढत्या वयामुळे संधिवाताचा त्रास होतो. साधारणतः साठ वर्षानंतर हा त्रास वाढता असल्याचे दिसून येतो > – लठ्ठपणामुळे संधिवात होण्याची शक्यता वाढते >- वाढलेल्या वजनाचा अति भार हा गुडघ्यावर व खुब्याच्या सांध्यावर पडत असतो >- व्यायामाचा अभाव असल्यास कार्टिलेजची क्षमता कमी होते >- हाडाचे फ्रॅक्चर असल्यास हा त्रास वाढतो >- दोन सांध्यांमध्ये गॅप असल्यास ही स्थिती निर्माण होते.

– शरिरातील हार्मोनल बदल, मासिक पाळी यामुळे कॅल्शियमची कमतरता निर्माण होत असल्याने पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये सांधीवात होण्याची शक्यता अधिक असते
चला आता आम्ही आपणास सांधेदुखी आणि स्नायूचे दुखणे दूर करण्यासाठी घरच्या घरी करता येतील असे उपाय सांगनार आहोत.

१) शरीराच्या सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना झाल्यानंतर दिवसभर अस्वस्थ वाटत राहते. याचा कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम होतो. स्नायूंमध्ये निर्माण होणारा आकस व ताणापासून बचाव करण्यासाठी आणि वेदनेपासून सुटका करण्यासाठी विविध उपाय आहेत. त्यापैकी एक म्हणजे मालिश करणे होय.

२) वेदना झाल्यास बामने थोडेसे चोळावे. बाममध्ये असलेला पुदिन्याचा सार व कापुराने पेन फायबर्सचे सेन्सर्स ब्लॉक होतात. त्यामुळे वेदना कमी होतात. तसेच चोळल्यामुळे रक्तप्रवाहही सुरळीत होतो.

३) तसेच मॅग्नेशियमची कमतरता असल्यासही स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. भरपूर मॅग्नेशियम असलेल्या केळी, भुईमूग, अॅ्व्होकॅडो, सर्व प्रकारचे धान्य व सोयाबीनपासून तयार केलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.

४) आंघोळ करताना पाण्यात थोडेसे मीठ मिसळल्यास वेदना कमी होतात. > ५) तसेच हा त्रास घालविण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर वर्कआऊटही करता येईल. योगासने, थाय-ची व वॉकिंग अशा एक्झरसाइजमुळे वेदना कमी होऊ शकतात. यापैकी कोणताही व्यायाम करणारांचे स्नायू नेहमी रिलॅक्स असतात.

६) संगीत ऐकल्यानेही सांधे आणि स्नायूंच्या वेदनेपासून सुटका होते, असे एका फ्रेंच संशोधनात आढळले आहे. या संशोधकांना कर्करोगपीडितांवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, जे पीडित ३० मिनिट संगीत ऐकत होते, त्यांच्या वेदना ५० टक्क्यांनी कमी झाल्या. संगीत ऐकल्यानंतर मिळणाऱ्या आनंदामुळेच वेदनेकडे दुर्लक्ष होते.

७) नियमित व्यायाम, योगासने करावीत, चालणे, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम करावेत. > ८) हाडांची झीज होत असल्यास कॅल्शियमचे हाडांपर्यंत शोषण होण्यासाठी ड जीवनसत्त्वाची गरज असते. त्यासाठी सकाळचे कोवळे ऊन अंगावर घ्यावे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *