सलाम आईच्या ‘या’ जिद्दीला!आपल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी, सर्व शक्ती एकवटून आईने दिला चक्क अवाढव्य वाघाला लढा..

सलाम आईच्या ‘या’ जिद्दीला!आपल्या चिमुकलीला वाचवण्यासाठी, सर्व शक्ती एकवटून आईने दिला चक्क अवाढव्य वाघाला लढा..

जगात आईच्या हृद्याइतकं कोमल काहीच नसत असं म्हणलं आणि सजमल जातं. आईच काळीज नेहमीच आपल्या लेकरासाठी आणि त्याच्याच विचारात गुंतलेलं असत. आईच्या ममतेच रूप पाहिलं की, अत्यंत सोज्वळ असा भाव जागा होतो. मात्र, जेव्हा आपल्या मुलावर संकट ओढवत तेव्हा हीच आई, दुर्गेच रुप घेते.

आपल्या मुलासाठी एका आई संपूर्ण जगासोबत युद्ध करू शकते. प्रश्न जेव्हा आपल्या काळजाच्या तुकड्याचा येतो, तेव्हा हीच आई उभ्या जगासबोत युद्ध मांडते आणि आपली सर्व शक्ती एकवटून झुंज देते. एक वेगळीच शक्ती त्यावेळी तिच्यामध्ये संचारलेली असते. एक नवी ऊर्जा त्यावेळी तिच्यामध्ये असते, आपल्या मुलाची सुरक्षितता एवढं एकच त्या माय-माऊलीच्या डोक्यात असत.

अशा आपण अनेक कथा- घटना ऐकल्या आहेत.आपल्यापैकी अनेकांनी अश्या प्रकारच्या घटनांचा अनुभव देखील घेतला आहे. अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. एका आईने आपल्या मुलाचे प्रा’ण वाचवण्यासाठी थेट वाघासोबत कु’स्ती केली, आणि विशेष म्हणजे तिने हि कुस्ती जिंकलीसुद्धा.

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना या छोट्याश्या गावात हा प्रकार घडला. जुनोना गावात राहणाऱ्या अर्चना संदीप मेश्राम या आईने आपल्या मार्तृत्वाची पराकाष्ठा काय असू शकते याचा परिचय दिला. एका भल्यामोठ्या वाघाच्या जबड्यातून आपल्या चिमुरडीला बाहेर काढत तिचा जी’व वा’चवला. आपल्या मुलीसाठी स्वतःच्या जिवावर उदार होणाऱ्या या माऊलीच्या सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे.

तिच्या या शौर्याचे सगळीकडेच कौतुक केले जात आहे. आपल्या मुलीला उपचारासाठी शुक्रवारी नागपूर येथील शासकीय रु’ग्णालयात घेऊन आली तेव्हा तिने तेथील डॉ’क्टरांना घडलेल्या घटनेचा वृत्तांत सांगितला. डॉक्टरांनीदेखील तिच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम ठोकला.

चंद्रपूर पासून साधारण ७ किमी अंतरावर जुनोना हे गाव आहे. १ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता अर्चना शौचालयासाठी जंगलाकडे निघाल्या होत्या. आपल्या आईच्या पाठीमागे, त्यांची पाच वर्षांची मुलगीसुद्धा निघाली. आणि याच वेळी जणू काळाने आ’घात केला, एका झुडपात लपून बसलेल्या भल्यामोठ्या वाघाने त्या छोट्या मुलीवर हल्ला चढवला.

‘आई’ म्हणून त्या मुलीने जोरात आरोळी दिली आणि तत्क्षणी अर्चना यांनी मागे वळून पाहिलं, तेव्हा त्यांच्या मुलीचं डोकं वाघाच्या जबड्यात होतं. अर्चना यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वाघाच्या जबड्यात आपल्या मुलीला पाहून अर्चना सुरुवातीला चांगल्याच घाबरल्या.

मात्र, त्यानंतर आपली सर्व शक्ती एकवटून जवळ पडलेली बांबूची काठी उचलून त्यांनी वाघाच्या शेपटीवर मारली. वाघाने मुलीला खाली फेकले आणि अर्चना यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पुन्हा आपली सर्व शक्ती एकवटून पूर्ण ताकदीनिशी काठीने वाघावर हल्ला चढवला. यानंतर वाघाने घाबरून तिथून पळ काढला.

वाघ जाताच र’क्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आपल्या मुलीला उचलून अर्चना गावाकडे धावतच सुटल्या. त्वरित आपल्या पतीसोबत घेऊन त्यांनी आपल्या चिमुरडीला रु’ग्णालयात दाखल केलं. डॉ’क्टरांनी मुलगी सुखरूप असल्याच सांगितलं आणि त्यानंतरच मेश्राम दाम्पत्याच्या जिवात जी’व आला आहे.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *