संगणकाचा कीबोर्ड ‘एबीसीडी’ या क्रमाने का सेट करत नाहीत? ‘हे’ आहे कारण.

संगणकाचा कीबोर्ड ‘एबीसीडी’ या क्रमाने का सेट करत नाहीत? ‘हे’ आहे कारण.

कॉम्प्यूटवर टायपिंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की कीबोर्डच्या कीज सरळ वाचता येईल, अशा अल्फाबेटिकली (abcd) ऑर्डरने का दिली जात नाही? आता स्मार्टफोनवरही दिसणारा टचस्क्रीन कीबोर्डही तसाच क्वर्टी प्रकारचा असतो.

याचे उत्तर आपण कधी ना कधी कोणाला तरी विचारले असेल. मात्र याचे बहुतेकदा उत्तर मिळत नाही. याचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला 19व्या शतकात जावे लागेल, ज्यावेळी चार्ल्स बेबेज नावाच्या गणित तज्ञाने सर्वप्रथम प्राथमिक स्वरुपातील कॉम्प्युटरचा शोध लावला. त्यामुळे बेबेजला कॉम्प्युटरचा पिता असेही संबोधण्यात येते.

बेबेजच्या कॉम्प्युटरनंतर आतापर्यंत कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये बरीच प्रगती झाली आहे. परंतु एक गोष्ट अजिबात बदलली नाही, ती म्हणजे कॉम्प्यूटरचा क्वर्टी कीबोर्ड. बेबेज जेव्हा कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या बटणांचा क्रम निश्चित करीत होते.

तेव्हा त्यांना आढळून आले की कीज त्या काळातील टाईपराईटर मशिनप्रमाणे अल्बाबेटिकली क्रमात सेट केल्या तर त्या जाम तर होत होत्याच याशिवाय abcd क्रमाने त्या वेगवेगळ्या स्पेलिंगसाठी दाबतानाही अडचणी येत होत्या.

टाईपरायटरमध्ये बॅकस्पेस बटण नसल्यामुळे टायपिंग करताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करुन पुन्हा टाईपही करता येत नव्हते. त्यामुळे कॉम्प्यूटरसाठी abcd अल्फोबेटिक कीबोर्ड वापरुन चालणार नाही. हे बेबेजच्या लक्षात आले.

बेबेजने खूप अभ्यास केल्यानंतर सुलभ टायपिंगसाठी क्वर्टी क्वर्टी कीबोर्डचा शोध लावला. या बटणांचा वापर प्रत्येकाला करता येत होता आणि दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करुन जलद गतीने टायपिंगही करता येत होते. पुढे टाईपरायटरमध्येही क्वर्टी कीबोर्ड वापरला जाऊ लागले.

सुरुवातीचे कॉम्प्युटर आणि आजचे कॉम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम, स्पीड, वापराचे विभाग यामध्ये प्रचंड तफावत असली तरी क्वर्टी कीबोर्ड मात्र कायम आहे. सध्या स्मार्टफोनवरील व्हाईस टायपिंगच्या जमान्यातही क्वर्टी कीपॅडचे महत्व अजिबात कमी झालेले नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *