शनिवारी ‘या’ गोष्टी करणे टाळा , होऊ शकतो शनिदेवाचा प्रकोप

ह्या दिवसात लॉकडाऊन चालू आहे, परंतु सामान्य दिवसामध्ये शनिवार हा एक प्रकारचा वीकेंड असतो आणि ह्या दिवशी आपण मस्ती च्या मुड मध्ये असतो. सवड असल्यामुळे आपण फिरायला निघून जातो. परिवारासोबत खरेदीसाठी पण जातो
हा दिवस शनिदेवाच्या उपासनेसाठी व हनुमानाची पूजा करण्यासाठी पण उत्तम दिवस असतो. शनिवारी खरेदी करणे चांगले असते, परंतु मान्यतेनुसार आपण या दिवशी काही गोष्टी खरेदी करणे टाळले तर आपल्यासाठी चांगलेच होईल… या गोष्टी खरेदी करण्यापासून वाचा…
शनिवारी लोखंडाची खरेदी टाळा. कारण या दिवशी लोखंडापासून बनवलेल्या वस्तू दान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. लोखंडी वस्तू दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात.
तुम्ही शनिवारी तेल खरेदी करणे टाळावे. कारण या दिवशी मोहरीचे किंवा कोणत्याही पदार्थाचे तेल विकत घेतल्यास एखादा व्यक्ती आजाराने बळी पडायला लागतो. ज्योतिषी सांगतात की, शनिवारी तेल विकत घेतल्यास लोकांना रोगांचा त्रास होण्यास सुरवात होते.
शनिवारी मीठ विकत घेतल्यास कर्ज वाढण्याची किंवा वाढण्याची शक्यता असते. शनिवारी कात्री खरेदी करु नका. यामुळे नात्यात तणाव निर्माण होतो.
शनिवारी कधीही काळे तीळ विकत घेऊ नका. काळे तीळ अर्पण केल्यास शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांना बर्याच संकटामधून पण बाहेर काढतात.
शनिवारीही काळ्या चपला सुद्धा खरेदी करू नका. अशी मान्यता आहे की शनिवारी विकत घेतलेल्या काळ्या चपला परिधान करणाऱ्यास कामात अपयश देतात.
या दिवशी शाई खरेदी करू नका. हे माणसाला अपयशाचे भागीदार ठरवतात. शिक्षण आणि लिखाणाशी संबंधित गोष्टींसाठी गुरुवार हा सर्वोत्तम दिवस आहे.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.