लठ्ठपणा वर मात करण्यासाठी नाश्त्यामध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, पहा वजन इतके कमी होईल की…

सध्या लहानपणापासूनच अनेक मुले हे लठ्ठपणाचा शिकार होत असल्याचे आपण पाहिले असेल. पूर्वीच्याकाळी सकस आहार असल्याने अनेक मुलांना लठ्ठपणा पासून दूर ठेवण्यास त्यांचे पालक यशस्वी राहत होते. मात्र, सध्याच्या जमान्यामध्ये जंकफूड बाहेरचे खाणे यामुळे लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
समोसा, पिझ्झा, बर्गर, तळलेले पदार्थ, फरसाण पाणीपुरी असे अनेक पदार्थ बाहेर सर्रासपणे खाल्ल्या जातात. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा त्रास जाणवतो. लठ्ठपणा झाल्यामुळे इतर आजारांना निमंत्रण मिळते. आजच्या जमान्यात अनेक पालक मुलांचा लट्ठपणा कसा कमी करावा यामुळे त्रस्त झालेले आहेत. तसेच मोठ्या व्यक्तींना देखील लठ्ठपणाचा त्रास हा जाणवत असल्याचे आपण पाहिले असेल. तर आम्ही आपल्याला आज असे पदार्थ सांगणार आहोत याचे सेवन केल्यावर आपण लठ्ठपणापासुन दूर राहू शकता.
१ दलिया: आपण नाश्त्यामध्ये इतर पदार्थ सेवन करत असतो. यासोबतच दलिया याचा समावेश केल्यास त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुम्ही दलिया याचे सेवन करून लठ्ठपणावर मात करू शकता.
२. केळी : केळी ही बाजारामध्ये सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन, मिनरल, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे घटक आढळतात. केळीचे सेवन तुम्ही नाश्त्यामध्ये केल्यास तुमचे वजन उतरण्यास मदत होते. तसेच तुमची चरबी देखील वाढत नाही. त्यामुळे ते नियमितपणे सेवन करावे.
३.बेरी: हे फळ बाजारामध्ये सहज उपलब्ध होते. या फळाचे सेवन केल्यानंतर आपल्याला लठ्ठपणाचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे या पदार्थांचे सेवन नियमित प्रमाणे करावे. वजन कमी करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
४.ताक: भारतीय आहारामध्ये ताक हे सर्रास पाणी वापरले जाते. जेवणानंतर किंवा जेवणाआधी ताकाचा आपण आहारात समावेश केला, तर याचा तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. ताक नियमित सेवन केल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते
त्यामुळे ताकाचे सेवन नियमित करावे.
५.ग्रीन टी : सध्या अनेकांचा कल हा ग्रीन टी घेण्याकडे असतो. चहा-कॉफी टाळून अनेक जण ग्रीन टी घेताना दिसतात. ग्रीन टीचा आपल्या ैनंदिन जीवनात समावेश केल्यास याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुमचे वजन वाढत नाही. तसेच ग्रीन टीमुळे तुमची रक्तदाब देखील नियंत्रण राहते.