लग्नानंतर महिलेने ६ महिन्यातच दिला बाळाला जन्म, सासू-सासर्यांनी घराबाहेर काढलं, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळेच झाले सुन्न..

लग्नानंतर महिलेने ६ महिन्यातच दिला बाळाला जन्म, सासू-सासर्यांनी घराबाहेर काढलं, पण जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा सगळेच झाले सुन्न..

आपण रोज वेगवगेळ्या बातम्या वाचतो. यामध्ये काही बातम्या अचंबित करणाऱ्या ठरतात तर काही अगदीच विचित्र असतात. अशा काही घटना समोर येतात ज्यामुळे, आपल्या आश्चर्याचा धक्काच बसतो. नुकतंच असंच एक खूपच अजब प्रकरण समोर आलं आहे. या प्रकाराने सगळ्यांनाच अचंबित केले आहे. ग्वाल्हेरच्या अशोकनगर येथे हि घटना घडली आहे.

ग्वाल्हेरमध्ये एका महिलेनं लग्नानंतर केवळ 6 महिन्यातच बाळाला जन्म दिला. गरोदर राहिल्यानंतर साधारण नऊ महिन्यात बाळ होणं सहाजिकच आहे. कधी कधी बाळ त्याआधी म्हणजेच सातव्या महिन्यात देखील बाळ होऊ शकते. मात्र येथे लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच बाळाला जन्म दिल्याने, संबंधित महिलेच्या सासरी एकच गोंधळ उडाला आहे.

सहा महिन्यातच बाळाचा जन्म होताच, आजूबाजूच्या लोकांनी चर्चा सुरू केली. अशी चर्चा सुरु होताच सासरकडच्यांनी हे बाळ आपल्या मुलाचं नाही असं सांगत महिलेला घराबाहेर काढलं. संबंधित घटना एका वर्षापूर्वीची आहे. कौटुंबीक न्यायालयाने या प्रकरणी महिलेच्या सासू-सासऱ्यांची ऑनलाईन काउन्सलिंग करून हे कुटुंब तुटण्यापासून वा’चवलं.

ग्वाल्हेरमधील कौटुंबिक न्यायालयाचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी याबद्दलची माहिती देत सांगितलं की, ‘अशोक नगर येथील एका 25 वर्षीय महिलेने सोशल मीडियावर मध्यस्थी सेलचा नंबर पहिला आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला होता. याबद्दलच संपूर्ण माहिती देत असताना त्या महिलेने सांगितलं की, 30 मे 2020 रोजी तिचा गुना येथील एका तरुणासोबत प्रेमविवाह झाला होता.

फेसबुकवर या महिलेची आपल्या पतीसोबत ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर ते दोघंही एकमेकांसोबत चॅट करू लागले. चॅट वर बोलतच त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडलं. त्यांच्यामधील जवळीक वाढली आणि दोघ भेटू लागले. त्या दोघांना एकमेकांवर अतोनात प्रेम जडले आणि त्यांनी प्रथम मंदिरात लग्नगाठ बांधली होती.

आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा सगळ्यांसमोर लग्न केले. 10 डिसेंबर रोजी म्हणजेच लग्नाच्या 6 महिन्यांनंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र सहा महिन्यांतच मूल झाल्याने सासरच्या मंडळीत चांगलीच खळबळ उडाली. सासरची सर्व मंडळी आणि शेजारी राहणारे लोकसुद्धा तिच्यावर घा’णेर’डे आ’रोप करू लागले. पण सत्य काय आहे हे आपल्या पतीला माहीत असल्याचं ती महिला सांगत राहिली.

तरीही, काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिला घरातून बाहेर काढलं आणि माहेरी पाठवलं.’ अशी संपूर्ण माहिती ऐकल्यानंतर समुपदेशन पथकाने, गुना येथे राहणाऱ्या त्या महिलेच्या पतीशी संपर्क साधला. त्यावेळी पतीने देखील ते मूल आपलं नसल्याचं सांगितलं. यानंतर टीमने सांगितलं की, तरुणाने सर्व घरच्यांसमोर सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता.

परंतु, त्यापूर्वी त्याने मंदिरात काही महिन्यांपूर्वी याच महिलेशी लग्न केलं होतं व त्यानंतर आपली पत्नी बनवून तिच्यासोबत शारीरिक सं’बंध ठेवले होते. टीमने पतीला सांगितलं की, मुलाची डीएनए चाचणी केली आणि ती त्याच्याशी जुळली तर पत्नीचा सांभाळ करत नाही म्हणून त्याला तुरुंगात जावं लागेल. या व्यक्तीने टीमचं बोलणं ऐकल्यानंतर त्वरित मान्य केलं की ते बाळ त्याचंच आहे.

समाज आणि कुटुंबाच्या भीतीने आपण चूक मान्य करत नव्हतो, असं देखील तो म्हणाला. टीमने त्याची भरपूर समजूत काढली आणि त्यानंतर अखेरीस हिंमत करून त्याने आपल्या घरच्यांना सर्व सत्य सांगितलं. सत्य समोर आल्यानंतर सासूलासुद्धा आपल्या चुकीची जाणीव झाली. मग तिने आपल्या सुनेसोबत संवाद साधला. या ऑनलाईन बोलण्यात सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यानंतर आपली चूक सुधरवत महिलेची सासू सुनेच्या घरी गेली. त्यानंतर आपल्या सुनेला व नातवाला घेऊन आनंदाने आपल्या घरी घेऊन आली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.