रोगप्रतिकारशक्ती ते पचनक्रिया अश्या सगळ्या समस्यावर फायदेशीर आहे ‘ओव्याचा’ काढा, फायदे वाचून आजच प्यायला सुरुवात कराल !

रोगप्रतिकारशक्ती ते पचनक्रिया अश्या सगळ्या समस्यावर फायदेशीर आहे ‘ओव्याचा’ काढा, फायदे वाचून आजच प्यायला सुरुवात कराल !

भारतातील घराघरात ‘ओवा’ हा बघायला मिळतो. मसाला आणि तडका देण्यासाठी अश्याप्रकारे दोन्हीप्रकारे अन्नाची चव वाढविण्यासाठी ओवा हा वापरला जातो. ज्याप्रमाणे ओवा जेवणाची चव वाढवतो त्याचप्रमाणे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

ओवाचे काही दाणे तोंडात टाकून ते चावल्याने तोंडातला दुर्गंध हा दूर होतो. याचप्रकारे ओवा शरीराला अनेक प्रकारे फायदा देखील करतो. ओवा मध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात. यात लोह, तांबे, फॉस्फरस, आयोडीन, कोबाल्ट आणि मॅंगनीज सारख्या खनिज पदार्थांचा समावेश असतो. ओव्याचा काढा पिण्याचे बरेच फायदे आहेत. चला ओव्याच्या काढ्याचे फायदे जाणून घेऊया…

पोटाच्या समस्येवर ओवा हा खूप फायदेशीर आहे. खाण्यापिण्याच्या वाईट सवयींमुळे पोटात अपचन, पोट फुगणे, पोटात दुखणे अश्या अनेक समस्या उद्भवतात. ओव्याच्या काढ्यात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात, म्हणून या सर्व समस्यावर ओव्याच्या काढा आराम देतो. ओवाच्या काढ्याने पचन प्रणाली मजबूत होते, ज्यामुळे आपले पचनक्रिया सुधारते.

दररोज ओव्याचे पाणी सेवन केल्यास, आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते, ज्यामुळे आपले शरीर बर्‍याच रोग आणि विषाणूंपासून सुरक्षित राहते. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ओव्याच्या काढ्याचे सेवन करू शकता.

बदलत्या वातावरणामुळे सर्दी-खोकला होणे हे एक सामान्य आहे. सर्दीमध्ये ओव्याचा काढा खूप फायदेशीर आहे. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित ठेवते, जेणेकरून आपले शरीर हंगामी रोगांपासून वाचू शकेल. ओव्याचा काढा पिण्याने कफ पासून देखील आराम मिळतो.

ओव्याचा काढा कसा तयार करायचा – ओव्याचा काढा तयार करण्यासाठी दोन कप पाणी घ्या आणि त्याला उकळण्यासाठी ठेवा. नंतर त्यात एक चमचा ओवा आणि थोडी हळद घाला. त्यानंतर ते चांगले उकळू द्या. जेव्हा पाणी उकळायला लागेल आणि सुमारे अर्धे पाणी शिल्लक असेल तर त्याला खाली उतरवा आणि थोडावेळ थंड होऊ द्या. यानंतर मध, काळे मीठ आणि काही थेंब लिंबाचा रस त्यात मिसळा. आणि त्याचे सेवन करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *