रेस्टॉरंटमध्ये जेवण घशात अडकला घास, एक जण बेशुद्ध, मग वेटरने काय केले बघा

रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना घास घशात अडकल्याने एक व्यक्ती बेशुद्ध पडला. मग वेटरने जे केले‌ ते पाहून. अनेक जण आश्चर्यचकित झाले.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ गुडन्यूज करस्पाँडंट नावाच्या अकाउंटवर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथे शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, 38 वर्षीय व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून जेवत आहे. त्यावेळी इतर काही लोकही रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते.जेवताना संबंधित व्यक्तीला खोकला आला. त्यामुळे त्याच्या घशात अन्न अडकले, त्यामुळे त्याला प्रचंड त्रास झाला होता. अनेक जणांना ऑफिसचे काम असते. त्यामुळे घाई घाई मध्ये जेवत असतात.

मात्र, असे घाईघाईने जेवणे हे अजिबात कामाचे नसते. यामुळे तुमच्या घशामध्ये अन्न अडकून तुम्हाला खूप मोठा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कधीही शांततेत जेवण करावे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथील एका व्यक्तीसोबत असेच काही घडले.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ही व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून जेवण करताना बेशुद्ध पडते.

घशात अन्न अडकल्याने हा प्रकार घडल्याचे दिसत आहे. यानंतर रेस्टॉरंटमधील सर्वजण खवळले. मात्र, तेथील वेटर्स आणि पोलिसांनी त्यांचे प्राण वाचवले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ गुडन्यूज करस्पाँडंट नावाच्या अकाउंटवर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ब्राझीलमधील साओ पाउलो येथे शुक्रवारी ही घटना घडल्याची माहिती आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, 38 वर्षीय व्यक्ती रेस्टॉरंटमध्ये बसून जेवत आहे. त्यावेळी रेस्टॉरंटमधील इतर काही लोकही जेवण करत असतात. मात्र, काही वेळाने ती व्यक्ती जेवताना बेशुद्ध पडली. तेथे उपस्थित असलेल्या इतर लोकांनी त्याला बेशुद्ध पडताना पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्याकडे धाव घेतली. सर्वांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, रेस्टॉरंटचा वेटरही तेथे पोहोचला. त्याला ही बाब समजल्यावर त्याने त्या व्यक्तीच्या पाठीवर बसून मारहाण करण्यास सुरुवात केली. घशात अडकलेले अन्न खाली यावे म्हणून तो असे करत होता. काही वेळानंतरही त्याला काही फरक पडला नाही. तेव्हा एक पोलिसही तेथे आला. प्रत्येकजण त्या व्यक्तीच्या पाठीवर जोर देत होता.

बराच वेळ असे केल्यावर त्या व्यक्तीला हलकीशी जाणीव झाली. त्यानंतर त्याला पाणी देण्यात आले. यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. घशात अडकलेले अन्न बाहेर आल्यावर व्यक्तीला आराम वाटतो. तो पुन्हा नीट श्वास घेऊ लागतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक वेटर आणि पोलिसांचे कौतुक करत आहेत. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत १.४७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे ते आम्हाला नक्की सांगा.

Neeta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *