‘रिंकल्स’, ‘पिंपल्स’ घालवण्यासाठी तसेच गोऱ्या रंगासाठी ‘या’ पध्द्तीने करा ग्रीन टी चा वापर, पहा त्वचा इतकी चमकेल की…

‘रिंकल्स’, ‘पिंपल्स’ घालवण्यासाठी तसेच गोऱ्या रंगासाठी ‘या’ पध्द्तीने करा ग्रीन टी चा वापर, पहा त्वचा इतकी चमकेल की…

सध्या मोठ्या प्रमाणात लोक आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहेत. पूर्वी त्याकाळी लोक हे दिवसातून किमान आठ ते दहा वेळेस चहा घेत. मात्र, आता हे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे. बरेच लोक आता दिवसातून एक वेळेस चहा तसेच काही लोक हे काळा चहा घेतात. नागरिक आता आरोग्याबाबत सजग झाल्यामुळे आता ग्रीन टी घेण्याचे प्रमाण वाढले आहे.

ग्रीन टी चे फायदे खूप चांगले आहेत. ग्रीन टीमध्ये अँटि ऑक्सिडंट असतात. त्यामुळे ग्रीन टीमुळे शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. तसेच ग्रीन टीचा वापर इतर कारणांसाठी देखील करण्यात येतो. आम्ही आपल्याला या लेखात हीच माहिती देणार आहोत.

गोरा रंग: आपला चेहरा आपला तजेल आणि गोरा करायचा असल्यास वापरलेल्या दोन ग्रीन टी च्या बॅग्स पाण्यात उकळा. त्यामध्ये एक चमचा मध दोन-तीन थेंब लिंबाचा रस घालून मिश्रण चेहर्‍यावर लावायचे आणि दहा मिनिटानंतर तोंड धुऊन घ्यायचे, असे आठवड्यातून दोन वेळेस करा. तुमचा चेहरामध्ये लगेच फरक दिसून येईल.

पिंपल्स : आजकाल तरुणाईमधे मोठ्या प्रमाणात पिंपल्स आणि फोडांची समस्या जाणवते. त्यामुळे पिंपल्स कमी करण्यासाठी बाजारात विविध औषधे देखील असतात. मात्र, या औषधांचा अधिक फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही घरगुती उपाय करून देखील पिंपल्स कमी करू शकतात. ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया तत्वे असतात.

त्यामुळे तुम्ही ग्रीन टी चा वापर करून पिंपल्स कमी करू शकतात. तसेच तुमचा तेलकट चेहरा होत असेल तर हा उपाय तुम्ही करू शकता. ग्रीन टीमध्ये टॅनिन नावाचे द्रव्य असते. त्यामुळे तुमचा तेलकट चेहरा याचा वापर केल्याने सजल दिसायला लागेल.

अर्धा कप पाण्यामध्ये ग्रीन टीचे दोन चमचे घाला. त्यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ घाला, लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण उकळून घेत चेहऱ्यावर लावायचे. काही वेळानंतर हे मिश्रण काढून टाकायचे. आठवड्यातून असा प्रयोग दोन वेळेस केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर लगेच फरक दिसून येईल.

सुरकुत्या : जर आपल्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरुकुत्या असतील तर आपण बाजारातील महागडे औषधे घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय करू शकता. चेहऱ्यावर ग्रीन टी लाऊन आपण सुरुकुत्या पळू शकतात. पाण्यामध्ये ग्रीन टी दोन चमचे टाकायचे. त्यानंतर लिंबाचा रस टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ह्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. आठवड्यातून हा प्रयोग दोन वेळेस आपण करू शकता.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *