रहस्यमयी ! ‘या’ मंदिरात जाण्यास घाबरतात महिला, प्रवेश करताच आपोआप गळून पडतात केस….

रहस्यमयी ! ‘या’ मंदिरात जाण्यास घाबरतात महिला, प्रवेश करताच आपोआप गळून पडतात केस….

आपल्या देशात अनेक मंदिरं आहेत. जितके रस्ते किंवा चौक आहेत, जवळपास तेवढेच वेगवेगळे मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराची वेगळी अशी कथा आहे. पण या मंदिरांपैकी काहीच मंदिर पुरातन आहेत. आणि आपल्या प्रत्येक पुरातन मंदिरामाघे मोठा इतिहास असतो. त्यापैकी अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळे रहस्य दडलेले असतात.

ज्याचा अनेकांना परिचय देखील येतो. जसं की, बद्रीनाथ मंदिरामध्ये अनेकांना ईश्वरी शक्तीचा अनुभव येतो. दक्षिणेकडील गाणगापूरच्या मंदिरात सुद्धा अनेकजण एका वेगळ्या खास शक्तीचा अनुभव होत असल्याचे सांगतात. औरंगाबाद येथील भद्रा मारुती मंदिर तर प्रसिद्ध आहे. त्या मंदिरातील हनुमानाचा फोटो घेणे कोणालाच शक्य नाही.

आणि ज्यांनी तो फोटो घेतला, त्यांना कित्येक वेळ डोळ्यासमोर असहनीय असा प्रकाश बघायला मिळतो. अनेकांचे यामध्ये डोळे देखील गेल्याच्या बातम्या आहेत. असे अनेक रहस्य आपल्या देशातील वेगवेगळ्या मंदीरात दडलेले आहेत. हे असे नक्की का होतं, याचा शोध घेण्याचा अनेकांनी प्रयत्न केला मात्र कोणालाच यश मिळालं नाही.

आपल्याच देशात तामिळनाडू या राज्यातील त्रिचीमध्ये असणाऱ्या करूर गावाची ख्याती तर सगळीकडेच आहे. या गावात देखील एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराची कथा देखील अत्यंत रोचक आहे. पुरातन शास्त्रानुसार सांगितलं जात की, या मंदिरामध्ये भगवान ब्रम्हाने, महादेवाची खास पूजा केली होती. तेव्हापासुन या मंदिराला अनोखे महत्व आहे.

या मंदिरात महादेवाच्या पशुपतीश्वर रूपाची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाकडून झालेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून, त्यांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. त्यामुळे ज्यांनी कोणी काही चूक केली असेल, त्यांनी या मंदिरात पूजा केल्यास महादेव त्या व्यक्तीला प्रयश्चित्त करण्याची संधी देतात. मात्र या मंदिरात प्रवेश करताना, महिलांनी आपले पूर्ण डोकं झाकून घेतले पाहिजे.

आपले सर्व केस झाकून, घेऊन मगच या मंदिरात येऊन पूजा करावी असे विधान आहे. विजयनगर राज्यकर्ते देखील या मंदिरात विशेष पूजा करत होते. त्यावेळी, राजकुटुंबातील महिला आपले संपूर्ण केस झाकून घेऊ पूजा करत असे. एका राजकुमाराने चुकून केस झाकले नव्हते तर, तिचे केस तिथेच गळून पडले आणि नंतर महादेवाची खास अर्चना केल्यावरच तिच्या डोक्यावर केस आले.

तेव्हापासून असे अनेक महिलांच्या बाबतीत बघायला मिळाले. काहीच दिवसांपूर्वी कॉलेजातील मुलींचा एक समूह त्या मंदिरात दर्शन घेण्याकरिता गेला होता. त्यावेळी, एका मुलीची वेणी अचानकच गायब झाली. हे बघून ती आणि सोबतच्या दोन मुलींना चक्कर आली. त्याआधी देखील एक परदेशातील महिला तिथे नक्की काय होतं याचा शोध घेण्यासाठी गेली होती.

ती तिथे गेली मात्र बराच वेळ झाला तरीही ती बाहेर नाही आली, म्हणून तिच्यासोबतच्या लोकांनी जाऊन पाहिले तर ती तिथेच आपली वेणी शोधत होती. तिची वेणी देखील चमत्कारीक पद्धतीने गायब झाली होती. या मंदिरात असे नक्की का होते, याचा खुलासा अद्याप झाला नाहीये. असे कोण करते हेदेखील कोणालाच समजले नाहीये. मात्र या चमत्कारिक मंदिरात जाताना महिला चांगल्याच घाबरतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.