‘या 5’ गोष्टींचे सेवन केल्यास नसर्गिकरित्या, प्रतिकारक शक्तीसोबतच वाढेल तुमची लैंगिक शक्ती…

‘या 5’ गोष्टींचे सेवन केल्यास नसर्गिकरित्या, प्रतिकारक शक्तीसोबतच वाढेल तुमची लैंगिक शक्ती…

हल्लीचे दिवस कोरोनाचे आहेत. या दिवसात बरेच लोक गुणकारी उपाय म्हणून आयुर्वेदिक उपाय योजना करत असतात. सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा हाहाकार दिसून येत आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोना वेगाने फैलावत असताना दिसून येत आहे. सुरुवातीचे काळात लॉक डाऊन देखील करण्यात आले होते.

याचदरम्यान लॉकडाऊनमध्ये शिथिलता देखील देण्यात आली असल्याने कामानिमित्त बाहेर जात असाल तर प्रत्येकाची रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी हे काय सांगावे लागणार नाही. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात देखील अनेक गोष्टींचे सेवन करण्यास सांगितले गेले आहे. आयुर्वेदात सांगितलेले औषध आणि वनस्पती सर्वानाच सहज उपलब्ध होत असतात.

या गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या असून यातील बऱ्याच अशा गोष्टी आणि पदार्थ असतात की त्यांचा वापर आपण सर्व रोजच्या आहारात करत असतो. काहींचा वापर आपण रोज आपल्या जेवणातही करतो. सर्व रोगांवर आयुर्वेदात उपचार होय असल्याचे सर्वानाच माहीत आहे. आणि संपूर्ण जगाला हिंदुस्थानने ही देणगी दिली आहे. आज आपण अशाच पाच प्रतिकारशक्ती वाढणाऱ्या गोष्टींची माहिती करून आहोत.

1. हळद :- आपल्याकडे हळदीचे बाहेर देशातून आयात करावे लागत नाही. कारण आपला शेतीप्रधान देश असून हळद आपल्या शेतातच पिकते. आपल्या प्रत्येकाच्या घरात हळद नेहमीच उपलब्ध होत असते. हळद आपल्याकडे रोज जेवणात वापरली जाते. हळद खूपच गुणकारी अशी आहे. हळदीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणतत्व भरपूर प्रमाणात असतात.

हळदीमध्ये एंटी ऑक्सीडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेट्री गुण असल्याने शरीरासाठी हळद फायदेशीर ठरते. दुधासोबत किंवा मध आणि थोडे गरम पाण्यासोबत हळदीचे सेवन केल्यास शरीरास फायदा होतो. यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती तर वाढतेच वाढते त्यासोबतच बरेच आजार देखील आपल्यापासून दूर राहतात. रोगप्रतिकारक शक्ती देखील खूप प्रमाणात वाढते.

2. तुळस :- आपल्या देशात घरोघरी प्रत्येकाचे घरासमोर तुळस असतेच असते. घरासमोर तुळस असणे याला शास्त्रीय आणि आध्यात्मिक कारण देखील आहे. तुळसीच्या पानांमध्ये एंटी ऑक्सीडेंट्सचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. रोज तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होते. तुळशीच्या पानाचा रस काढून त्याचे सेवन मधासोबत केल्यास प्रतिकारशक्ती वाढण्याचा वेग जास्त असतो. तसेच अनेक प्रकारच्या काढ्यात तुळशीच्या पानाचा वापर करण्यास कोणीही विसरत नाही.

3. गुळवेल :- गुळवेलाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढविण्यात गुळवेल सर्वात पुढे आहेत. कोरोना च्या या काळात गुळवेलाला खूपच महत्त्व प्राप्त झाले आहे. सध्या गुळवेल शोधण्यास भरपूर लोकही जीवाचा आटापिटा करत आहे. गुणकारी असा हा वेळ अधिक चर्चेत आला आहे.

गुळवेल प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध झाल्यामुळे याची मागणी अधिकच वाढली आहे. बाजारात गुळवेलाच्या कॅप्सूल स्वरूपात गोळ्या किंवा ज्यूस स्वरूपातही उपलब्ध आहे. घरगुती उपाय म्हणून बऱ्याच घरांमध्ये याच्या पानांचा रस काढून त्याचे सेवन केले जात आहे.

4. आलं :- आल देखील आपल्या मायभूमीत पिकवले जाणारे कंदमुळं आहेत. रोजचा चहा, आणि भाज्या बनविताना विशेषतः यांची चव वाढवण्यासाठी आलं (अद्रक) याचा प्रतेक घरात रोज वापर केला जातो. सर्दी, खोकला किंवा हलका ताप असल्यास जुनी लोक तोंडात आलं ठेवून चघळण्यास सांगत असत.

याच्या तिखट उग्र रसामुळे कंठ सुखावतो व लवकर आराम मिळतो. आल्याचा वापर नियमित केल्यास प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यात एंटी बैक्टीरियल, एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी ऑक्सीडेंट गुण असल्याने याचे रोज सेवन करने फायदेशीर ठरते. मधासोबत आले खाल्ल्यास प्रतिकारशक्ती वेगाने वाढते.

5. अश्वगंधा :- सर्व जगात सध्या कोरोना चा कहर सुरू आहे. या काळात अश्वगंधा या औषधी वनस्पतीचे नाव बऱ्याच जणांचे तोंडून तुम्ही ऐकलेही असेल. आयुर्वेदात अश्वगंधा अनेक रोगांवर जालीम उपाय म्हणून वापरले जाते. दुधासोबत अश्वगंधा वनस्पतीचे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. रात्री झोपताना हा प्रयोग केल्यास झोप चांगली लागते आणि पुरेशी झोप झाल्याने प्रतिकारशक्ती वाढते.

(असे असले तरी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांचे सल्ले घेऊनच औषधांचे सेवन करा)

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *