‘या’ सुप्रसिद्ध विवाहित अभिनेत्याने माधुरी दीक्षितला घातली होती लग्नाची मागणी, म्हणाला होता माझ्याशी लग्न कर नाहीतर..

‘या’ सुप्रसिद्ध विवाहित अभिनेत्याने माधुरी दीक्षितला घातली होती लग्नाची मागणी, म्हणाला होता माझ्याशी लग्न कर नाहीतर..

माधुरी दीक्षित ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडला मिळालेली अनोखी देणगी होय. तेजाब, दयावान, हम आपके है कौन यासारख्या अनेक चित्रपटांमधून ताकदीच्या भूमिका माधुरी दीक्षित हिने साकारल्या. आजही बॉलिवुडमध्ये तिचे नाव चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी ती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली होती.

मात्र, काही वर्षांपूर्वी ती परत भारतात परतली असून सध्या टीव्ही शोमध्ये काम करते. याच शोमध्ये एका दिग्गज अभिनेत्याने माधुरी दीक्षित हिला माझ्यासोबत लग्न का केले नाही, अशी विचारणा केली. याबाबत आम्ही आपल्याला या लेखात माहिती देणार आहोत. माधुरी दीक्षित हिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

माधुरी दीक्षित हिने सुरुवातीच्या काळात बेटा, दिल, तेजाब यासारखे चित्रपट केले होते. तेजाब चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या जोडीची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर या जोडीने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. सगळ्यात शेवटी या जोडीने ‘टोटल धमाल’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

मात्र, माधुरी दीक्षित हिने काम केलेला दयावान हा चित्रपट अनेकांच्या लक्षात राहिला. या चित्रपटांमध्ये तिने दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत अतिशय बो’ल्ड असे दृश्य दिले होते. हे दृश्य मी का केले होते याचा पश्चाताप मला आजही होतो, असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले होते. माधुरी दीक्षित सध्या रियालिटी शो मध्ये देखील भाग घेताना दिसते.

नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये माधुरी दीक्षित आणि गोविंदा हे एकत्र आले होते. माधुरी दीक्षित आणि गोविंदा यांनी मोजक्याच चित्रपटात एकत्र काम केले आहे. या दोघांचा गाजलेला चित्रपट ‘बडे मिया छोटे मिया’ होय. या रिॲलिटी शोमधील व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गोविंदा माधुरी दीक्षितची मस्करी करताना दिसत आहे.

गोविंदा माधुरी दीक्षितला विचारताना दिसत आहे की, तुला मी लग्नासाठी तर विचारणा केली होती. मात्र, तिने नाही नाही म्हणत मी नेनेंसोबत लग्न केले. गोविंदा त्याच्या या वाक्यावर सगळे प्रेक्षक खूप हसले. त्यानंतर गोविंदा म्हणाला की, बडे मिया छोटे मिया हा चित्रपट आम्ही केला होता. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन देखील होते. या चित्रपटांमध्ये मी माधुरीला वेगळ्या अंदाजामध्ये देखील विचारले होते.

नाच के दिखवा लीजिये, आजमा के देख लीजिये, अपना के देखने लिजिए असे विचारल्यानंतर ही माधुरी दीक्षित हिने मी नाही नाही म्हणत नेनेंसोबत लग्न केले, असे गोविंदा म्हणाला. त्यानंतर प्रेक्षक हे हसायला लागले आणि माधुरी दीक्षितलादेखील काय उत्तर द्यावे तेच कळेना गेले.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.