या वनस्पतीचे सेवन केल्याने “मधुमेह” तर बरा होतोच, त्यासोबतच कधीच होणार नाही हे आजार..

आयुर्वेदामध्ये गुळवेल या वनस्पतीला अमृताचा दर्जा देण्यात आला आहे. याला गुडूची देखील म्हणतात या वनस्पतीच्या आयुर्वेदिक गुणांमुळे या गुळवेलला अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. अनेक अजारांवर मात करण्यासाठी गुळवेल ही वनस्पती फायदेशीर मानली जाते. आजच्या जमान्यात मुधमेह हा आजार अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
ज्यांना मधुमेह आहे त्यांना खूप काळजी घेणे आवश्यक असते. जागतिक आरोय संघटनेनुसार २०३० पर्यंत मधुमेह हा आजार सर्वात घातक बनण्याची शक्यता आहे. चांगल्या प्रकारचे राहणीमान आणि व्यायामासोबत गुळवेल सारख्या वनस्पतीचा आहरात समावेश करून या आजारावर मात करता येणे शक्य आहे. आम्ही आपल्याला या लेखात गुळवेलचे फायदे सांगणार आहोत.
जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात : गुळवेल या वनस्पतीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे भरलेली असतात. या वनस्पतीला आयुर्वेदात मधुमेहावर उपायकारक मानले जाते. आयुर्वदानुसार गुळवेलचा काढा, चुर्ण देखील खाऊन मधुमेहाला नियत्रंणात आणता येऊ शकते.
मधुमेह राहील नियत्रंणात : आजच्या जमान्यात अनेकांना बाहेर जाऊन काम करावे लागते. १२ तास घराबाहेर राहिल्यानंतर अनेकांना मधुमेहाचा त्रास जाणवत असल्याचे दिसून येत आहे. तसेच बाहेरच्या खाण्यामुळे वजन वाढते. यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते. यावर गुळवेल घेतल्याने मधुमेही रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो. अतिशय अल्प प्रमाणात गुळवेलचे सेवन करावे. यामुळे मधुमेह नियत्रंणात राहते. तसेच याच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनचे प्रमाण देखील वाढते.
ग्लायासोमिक इंडेक्स कमी होतो : आरोग्य क्षेत्रातील तज्ञानुसार गुळवेलाचे सेवन केल्याने हायपो ग्लायासोमिकप्रमाणे देखील काम करते. मधुमेहाच्या रुग्णांना कमी ग्लायासोमिक ( म्हणजेच साखरेचे प्रमाण) असलेले जेवन केले पाहीजे.
साखर नियत्रंणात ठेवण्यास मदत : गुळवेलाच्या सेवनाने शरीरात आढळणारी अतिरिक्त साखर ही नियत्रंणात राहण्यास मदत मिळते. यामुळे गुळवेलाचे सेवन हे मधुमेह असलेल्या व्यक्तीसाठी अतिशय फायदेशीर ठरत असल्याचे निदर्शास आले आहे.
असे करा गुळवेलाचे सेवन : गुळवेलाचे अनेक फायदे असले तरी अतिशय कमी प्रमाणात गुळवेलाचे सेवन केले पाहिजे. याचे अिधक प्रमाणात सेवन केल्याने अनेक आजारांचा सामना देखील करावा लागू शकतो. गुळवेलाचे काही पाने आणि ४०० मिली पाण्यात घेऊन ते अर्धे पाणी होईपर्यंत उकळावे. त्यानंतर त्यात २ ते ३ काळे मिऱ्याची पूड घालावी. या मिश्रणाचे किमान १० मिलीमीटर प्रमाणे दोनदा सेवन करावे. त्यासोबत आपण थोडा मध देखील घेऊ शकता.