‘या’ फोटोमध्ये एक मांजर लपली आहे, लाखात एक बुद्धिमान व्यक्तीच ती शोधू शकतो, फोटो झूम करून पहा उत्तर मिळेल..

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे फोटो व्हा’यरल होतात. अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटो यामध्ये काही तरी प्रश्न विचारलेला असतो. एखादे चित्र लपलेले आहे किंवा एखादी वस्तू लपलेली आहे. ती आपल्याला शोधायची असते. या गोष्टी अनेकांना शोधता येत नाहीत. त्यामुळे अनेकांना खूप वेळ यासाठी द्यावा लागतो.
अशा व्हिडिओ आणि अशा चित्रांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असतो. कारण की यातून आपला विरंगुळा तर होतच असतो. परंतु आपल्याला यातून काहीतरी नवीन शिकायला देखील मिळते. त्यामुळे या फोटो आणि व्हिडिओ याला चांगली मागणी आहे. त्यामुळे अशा पोस्ट आणि व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर येताना दिसत असतात. आज आम्ही आपल्याला एक अशीच पोस्ट सांगणार आहोत. यामध्ये एक मांजर चित्रामध्ये लपलेली आहे. ती आपल्याला शोधायची आहे.
काही चित्रे अशी आहेत, जी पाहून लोकांचे मन चक्रावते. नुकत्याच झालेल्या एक भागात ट्विटरवर असा एक फोटो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक मांजर लपून बसली आहे. चित्रातील मांजर शोधण्याचे आव्हान लोकांना देण्यात आले आहे, परंतु ती मांजर शोधण्यात भल्याभल्यांना घाम फुटला. मात्र, काही लोकांना अथक परिश्रमानंतर मांजर शोधण्यात यश आले.
हा फोटो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि तो कधी क्लिक म्हणजेच काढण्यात आला, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. पण, या चित्रात एक मांजर लपले आहे, जर तुमची दृष्टी तीक्ष्ण असेल तर शोधा आणि सांगा. व्हायरल झालेल्या फोटोला 67 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. काही लोकांनी मांजर पाहिले आहे, तर काही लोकांनी अद्याप मांजर पाहिलेले नाही.
तर तुम्ही मांजर पाहिलं का… जर तुम्ही अजूनही मांजर पाहिले नसेल, तर आम्ही तुम्हाला मदत करू. फक्त चित्रावर झूम वाढवा आणि उजवीकडे पहा. खाली तुम्हाला खिडकी च्या मध्यभागी एक मांजर बसलेली दिसेल. तरीही दिसत नसल्यास, चित्र थोडे अधिक झूम करा. मांजर तुम्हाला नक्कीच दिसेल. लोकही या फोटोवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘शेवटी मी मांजर पाहिली’. एकाने लिहिले, ‘मांजर शोधायला मला वेळ लागला’. तर दुसर्याने लिहिले की, ‘मी अजून मांजर पाहिली नाही’. मग ही मांजर शोधायला तुम्हाला किती वेळ लागला?