‘या’ ठिकाणी शाळेतील मुलांनाही येते मा’सिक पाळी ? पहा सरकार कडून फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही सॅनिटरी पॅडचे…

‘या’ ठिकाणी शाळेतील मुलांनाही येते मा’सिक पाळी ? पहा सरकार कडून फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही सॅनिटरी पॅडचे…

प्रकृतीने स्त्री आणि पुरुष दोघांना वेगवेगळे बनवले आहे. दोघांची देखील शारीरिक रचना वेगळी असते. स्त्री म्हणजेच महिला नवीन जीवाला जन्म देऊ शकतात. हा हक्क आणि शक्ती केवळ महिलांकडे आहे. म्हणून त्यांच्या शा’रीरिक रचनेनुसार, स्त्रियांना म्हणजेच महिलांना प्रत्येक महिन्याला मा’सिक पा’ळी येते.

सुरुवातीला मुलींसाठी हे काही नवीन आणि त्रा’सदा’यक असते. मात्र हळूहळू हे सर्वच महिलांसाठी अगदी सर्व साधारण होते. महिलांना प्रत्येक महिन्याला मा’सिक धर्म म्हणजेच पाळी येते हे तर आपल्याला ठाऊकच आहे. पण मुलांना पाळी येते, याबद्दल कधी ऐकलं आहे का? तुम्ही नक्कीच चक्रावून जाल, पण मुलांना देखील मा’सिक पाळी आल्याचं नव्याने ऐकायला मिळत आहे?.

हा प्रकार आपल्याच देशातील बिहार मधून समोर आला आहे. त्यामुळे सगळीकडेच हा विचित्र प्रश्न उभारण्यात येत आहे. सॅनिटरी नॅपकिन योजनेचा बिहारमध्ये शाळकरी मुलींना लाभ दिला जातो. मात्र, सारण जिल्ह्यातील मांझी ब्लॉकच्या हलखोरी साह हायस्कूलमध्ये चक्क येथील मुलींसोबतच मुलांनादेखील सॅनिटरी नॅपकिन आणि कपडे या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

फक्त मुलींनाच नाही तर शाळेतील मुलांना देखील सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी या शाळेत निधी मंजूर केल्याचा विचित्र प्रकार घडला आहे. या शाळेचे माजी मुख्याध्यापक काहीच दिवसांपूर्वी रिटायर झाले. त्यांच्या जागी नवीन मुख्याध्यापकांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर शाळेतील जुन्या योजनांच्या वापराचे प्रमाणपत्र नवीन मुख्याध्यापकांनी मागितले.

त्यावेळी याच शाळेमध्ये तब्ब्ल एक कोटी रुपयांच्या योजनांमध्ये गडबड झाली असल्याची ध’क्कादा’यक माहिती समोर आली आहे. याच घोटाळ्यांचा एक प्रमुख भाग म्हणजे या शाळेमध्ये मुलींसोबत येथील मुलांना देखील सॅनिटरी नॅपकिन आणि ड्रेस योजनेचा लाभ देण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला होता. या शाळेच्या माजी मुख्याध्यापकांनी तयार केलेल्या कागदपत्रांवरून समोर आले आहे की, त्यांच्या शाळेतील मुलींसोबतच मुलांना देखील मा’सिक पाळी येत होती.

याच संदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने नव्याने नियुक्त झालेल्या मुख्याध्यापकांकडून जुन्या योजनांचे उपयोग प्रमाणपत्र मागितले होते. त्यानंतर त्यांनी जुन्या कागदपत्रांची पडताळणी केली असता, जवळपास एक कोटी रुपयांच्या योजनांचे उपयोग प्रमाणपत्र सादर करण्यातच आले नव्हते. अशी धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला.

बँकेचे स्टेटमेंट आणि इतर सर्व बाबी तपासण्यात आल्या. त्याच दरम्यान राज्यात केवळ मुलींसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांची रक्कम शाळेतील मुलांच्या खात्यात देखील जमा करण्यात आली असल्याचे आढळून आले. सरकारकडून फक्त मुलींना सॅनिटरी नॅपकिनच्या योजनेची रक्कम देण्यात येते. मात्र हीच रक्कम अनेक मुलांच्या खात्यातसुद्धा जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.

हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर नवीन मुख्याध्यापकांनी या शाळेतील इतर अनेक अनियमितता शोधून काढून त्यासंदर्भा एक पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. शाळेतील मुले सॅनिटरी नॅपकिन वापरत असल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिक्षण विभागात हे पत्र समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

शिक्षण विभागाकडून आता याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे.या तपासामध्ये शाळेत करण्यात आलेली पै’शांची गड’बड आणि मुलांनाही या योजनेचा लाभ देण्यात आल्याची बाब खरी असल्याचे पु’रावे शोधण्यात येत आहेत. हे सर्व सत्य असल्याचे आढळल्यास दो’षींवर का’रवाई करण्यात येईल, असे शिक्षण विभागाचे डीपीओ राजन गिरी यांनी सांगितले आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.