यमुनोत्रीच्या ‘ह्या’ पवित्र तप्तकुंडामध्ये ‘बिना आगीचे’ ४ ते ५ मिनिटांमधे शिजून निघतात कच्चे तांदूळ..पण कसे, जाणून घ्या….

चारधामची यात्रा आपल्या देशात सर्वात पवित्र अशी समजली जाते, त्याचसोबत हिमालयातील प्राकृतिक सौंदर्य हे शब्दांत वर्णन करण्यासारखे नाहीये. ट्रेकिंग, बंजी-जम्पिंग, ह्या सर्वांचा आनंद घेत हि यात्रा पूर्ण होते त्यामुळे देखील हि यात्रा सर्वाना आवडते.
चारधामची यात्रा गंगोत्री आणि यमुनोत्रीच्या दर्शन घेतल्याशिवाय अपूर्ण मानली जाते. जिथे ह्या दोन्ही नद्यांचा उगम होते त्या पवित्र स्थानचे दर्शन घेऊनच चारधामची यात्रा सुरु होते. यमुनोत्रीला पवित्र ‘यमुना’ नदीचा उगम होतो.
उत्तरकाशी पासून ३०किमी च्या अंतरावर यमुनोत्रीचे मंदिर आहे. बंदर-पूंच पर्वतावर ह्या नदीचे उगमस्थान आहे. नदीचे उगमस्थान असलेल्या एका छोट्या पर्वताच्यामध्ये आहे पवित्र तप्तकुंड म्हणजेच अग्निकुंड.
हनुमान चट्टी पासून जवळपास ८ किमी चा ट्रेक करत तुम्ही यमुनोत्रीच्या उगमस्थान म्हणजेच यमुनोत्रीच्या मंदिरापर्यंत तुम्ही पोहोचता. घोडा, किंवा पालखी च्या मदतीने देखील तुम्ही जाऊ शकता. अतिशय सुंदर असा प्रकृतीचा आनंद घेत तुम्ही, तुमचा हा ट्रेक पूर्ण कराल.
छोटे-छोटे धबधबे, उंच झाडं सगळे बघून असे वाटते कि तुम्ही आभाळाच्या जवळ जात आहेत. अगदी सुंदर अश्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेत तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचता.
अगदी सुंदर आणि नयनरम्य असे दृश्य तुम्हाला दिसेल, असे आहे भव्य यमुनोत्रीचे मंदिर.
या मंदिराचे खास आकर्षण आहे, तप्तकुंड म्हणजेच अग्निकुंड. हे तप्तकुंड वैज्ञानिकांसाठी सुद्धा एक आश्चर्य आहे. ह्या तप्तकुंडाचे पाणी नेहमी गरम असते. उकळते असते असे बोलणे जास्त योग्य होईल. या तप्तकुंडात, कच्चे तांदूळ देखील शिजून निघतात. त्यामुळे भाविक आपल्या घरातूनच कच्च्या तांदळाची पोटली घेऊन जातात.
ही पोटली या तप्तकुंडात अवघ्या काहीच मिनिटांसाठी टाकतात आणि ते तांदूळ शिजतात… घरातून घेऊन गेलेली तांदुळाची पोटली ह्या पाण्यात भाविक काही मिनिटासाठी तप्तकुंडामध्ये टाकतात आणि अवघ्या ३-५ मिनिटांमध्ये अक्षरशः ते शिजून निघतात. त्यानंतर त्याच शिजलेल्या तांदळाचा भात या यमुनोत्री मंदिराचा प्रसाद म्हणून भाविक खातात.
कित्येक शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्न केला की, इतक्या उंच आणि थंड जागी ह्या कुंडामधील पाणी इतके गरम कसे असू शकते. पण, कोणालाही त्याचे उत्तर मिळाले नाही. हे पवित्र अग्निकुंड या मंदिराचे खास आकर्षण आहे. विदेशातून कित्येक लोकं, केवळ या तप्तकुंडला बघण्यासाठी येते येतात. बऱ्याच शास्त्रज्ञांनी ह्या कुंडाचे रहस्य जाणून घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण, कोणालाच यश मिळाले नाही.
असे देखील बोलले जाते की, ह्या पवित्र कुंडामध्ये अंघोळ केल्यास आपल्याला होणारे किंवा झालेले सर्व त्व’चेचे आ’जार बरे होण्यास मदत भेटते. त्याचा बऱ्याच लोकांना अनुभव सुद्धा आला आहे, मात्र शास्त्रज्ञांनी असा कोणताही दावा नाही केला. असा दावा जरी शास्त्रज्ञांनी केला नसला तरीही, इतक्या थंड परिसरात उकळत्या पाण्याचे रहस्य आजही कोणालाच उलगडले नाही.