…म्हणून रोजच्या आहारात साखरेऐवजी करा गुळाचा जास्त वापर, पहा ‘हे’ आजार राहतील दूर

आपण सर्वांना माहिती आहे की गुळाचे अनेक साखरेपेक्षा जास्त फायदे आहेत तरी सर्वसाधारणपणे आहारात कोणताही गोड पदार्थ खातो तेव्हा त्यामध्ये आपल्याला साखरेचा वापर केलेला आढळतो. आणि किंचित काहीवेळा गोड पदार्थ तयार करण्यासाठी गुळाचा वापर केला जातो.
परंतु तुम्हाला माहिती आहे का साखरेच्या तुलनेत गुळाचे अनेक फायदे आहेत. आपल्या आहारात जर आपण साखर न वापरता नियमित गुळाचा वापर केला तर बऱ्याच आजारांपासून सुटका देखील मिळवता येऊ शकते. चला जाणून घेऊया.
जर आपण नियमितपणे गुळाचा आहारात समावेश केला तर एन्ड्रो फिन्स हा हॅपी हार्मोन आपल्या शरीरात तयार होत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला जर तुम्हाला तणाव मुक्त आणि आनंदी राहायचे असेल आणि मुड चांगला ठेवायचा असेल तर आजच आहारात गुळाचा समावेश करा. साखरेच्या तुलनेने अनेक फायदे गुळाच सेवन केल्यामुळे शरीराला होत असतात.
साखर आणि गूळ हे दोन्हीही उसापासून बनवले जातात पण साखर बनवत असताना त्यातील लोह घटक, पोटॅशियम सल्फर, फॉस्फरस आणि कॅल्शियम इत्यादी नष्ट होतात. पण हे गुळासोबत होत नाही. पण तरीही भारतात गुळापेक्षा साखरेचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते.
गुळापासून तयार केलेले पदार्थ खाण्याने शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते. जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते. घसा खवखवत असल्यास गुळाचा खडा खल्ल्याने आराम मिळतो.
पोटाच्या निगडित असणाऱ्या बऱ्याच समस्यांवर गुळ खूप फायदेशीर आहे. गुळाचे सेवन केल्यामुळे आपले पचन तंत्र सुधारले जाते. जेवल्यानंतर गुळ खाल्ल्याने पचनक्रिया आणखी चांगली होते. डॉक्टर गर्भ वती स्त्रियांना देखील गुळ खाण्याचा सल्ला देतात. कारण अनेकवेळा त्यांना पोट साफ होत असताना त्रास सहन करावा लागतो आणि बसून त्यांचे अन्न पचन व्यवस्थित होत नाही.
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर साखरेच्या चहाचं सेवन न करता वजन कमी करण्यासाठी गुळाच्या चहाचं सेवन करू शकता. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.
थंडीमध्ये बऱ्याच लोकांना दम्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर ऑक्सिजनची कमतरता व वाढत्या प्रदुषणामुळे श्वास घेण्यास दम्याच्या रुग्णांना त्रास होतो. अशावेळी त्यांच्या शरीरामध्ये उष्णता सतत राहावी आणि कफ बाहेर पडावा यासाठी रोज दूध व गुळाचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.
गूळ साखरेच्या तुलनेत खूप फायदेशीर आहे. गुळामध्ये कॅल्शियम आणि लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
मासि कपाळी दरम्यान महिलांनी नियमित गुळाचे सेवन केले पाहिजे. कारण अशावेळी महिलांना पोटदुखीच्या त्रास होत असरो. ह्या त्रासातून मुक्तता मिळविण्यासाठी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गुळ खाल्ल्याने पोट दुखीचा त्रास कमी होतो. तसंच गुळाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासत नाही.