मर्द बनून ज्या रेसलेरने कित्येक लोकांना WWE च्या रिंगणात चित केले, तोच खऱ्या जीवनात निघाला ट्रा’न्सजें’डर…

6 ते 7 फुट उंचीचे तगडे पैलवान, भव्य व डोळे दिपवून टाकणारी विद्युत रोषणाई, एकाचवेळी 30 ते 40 हजार किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक बसू शकतील असे मोठमोठे स्टेडियम्स, अंगावर शहारे आणणारे संगीत व प्रत्येक फा’यटरची दिमाखदार एंट्री व त्या एंट्रीमुळे मैदानातील, स्टेडीयम मधील प्रेक्षाग्रहात प्रेक्षकांचा साजरा होणारा जल्लोष.
हे सगळं तुम्ही आम्ही लहान असताना पाहिलंय. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी कुठल्या खेळाबद्दल बोलतोय कारण, भारतात तर क्रिकेट वगळता असा कुठलाच खेळ नाही ज्याविषयी आम्हाला फारशी माहिती आहे.
भारतात, महाराष्ट्रात कुस्ती हा प्रकार तसा प्रसिद्ध व लोकप्रिय आहे, पण मी जो वरील उल्लेख केलेला आहे तो आपल्या भारतीय पद्धतीच्या कुस्तीबद्दल नाही, मी बोलतोय अमेरिकेतील प्रसिद्ध खेळ डब्ल्यूडब्ल्यूई WWE याविषयी, आता याच खेळातील एका प्रसिद्ध रेसलरने आपण ट्रां’सजें’डर असल्याचा ध’क्कादा’यक खुलासा केला आहे.
2007 ते 2014 दरम्यान डब्ल्यूडब्ल्यूई रिंगमध्ये खेळणारा प्रोफेशनल रेसलर टायलर रेक्सने एक ख’ळब’ळज’नक खु’लासा केला आहे. रेक्सचा असा विश्वास आहे की तो ट्रा’न्सजें’डर आहे. पत्रकार परिषदेत, या 42 वर्षीय माजी कुस्तीपटूने असे अनेक खु’लासे केले आहेत आणि तो पुढे म्हणाला कि मला आता सर्वजण गॅबी टुफ्ट या नावाने ओळखतील.
त्याने असे म्हंटले आहे कि तो वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच आ’ईचे कप’डे घालत होता आणि तेव्हापासूनच त्याच्यात स्त्री’त्व आले आहे असे म्हंटले जाते. पण जवळजवळ त्याने तीन दशके, आपल्या अस्तित्वाशी लढा दिला, ज्यामध्ये त्याला यश मिळाले आहे. या प्रकरणात गॅबी म्हणाला कि माझ्या पत्नीने या सर्वामध्ये मला मोठा पाठिंबा दर्शविला आहे.
2014 मध्ये, टायलरने कुटूंबाला वेळ देण्यासाठी कुस्तीतून निवृत्ती घेतली. मग तो फिटनेस गुरू, मोटिवेशनल स्पीकर, मोटरसायकल रेसर म्हणून काम करू लागला. गॅबीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की ज्या दिवशी त्याने इतर लोकांच्या बाबतीत विचार करून सोडून दिले, तेव्हाच मी खऱ्या अर्थाने मुक्त झालो होतो.
गॅबीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये आपण ट्रा’न्सजें’डर असल्याचे बोलले आहे. २००२ मध्ये प्रिस्किल्लाशी लग्न करणार्या या कुस्तीपटूची मिया नावाची एका नऊ वर्षाची मुलगी देखील आहे, आणि आपण आपल्या पत्नीशी दीर्घकाळ शा’रीरिक सं’बंध ठेवले नसल्याचे सांगायला देखील गॅबी विसरला नाही.
सरतेशेवटी, त्याने हे देखील लिहिले की मित्र आणि अनुयायी ही अशी एक गोष्ट आहे जी रेसलिंग आणि इतर खेळाडूना मिस नाही केली पाहिजे. विशेषत: एलजीबीटीक्यू समुदायातील, पण जर कोणीतरी ट्रा’न्सजें’डरच्या मुद्द्यांसह सं’घर्ष करत असेल तर त्याने घा’बरू नये मी मदत करण्यास नेहमीच तयार असतो असे त्याने म्हटले आहे.