मधात दालचीनी मिसळून खाल; तर पोटाच्या विकारांसह ‘या’ ५ समस्यांपासून नेहमी दूर राहाल

मधात दालचीनी मिसळून खाल; तर पोटाच्या विकारांसह ‘या’ ५ समस्यांपासून नेहमी दूर राहाल

तोंडावरील पुळ्या, पोटातील अल्सर अशा अनेक समस्यांचे उपचार घरगुती उपायांनी करता येऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला मधाचा वापर करून स्वतःला कसं निरोगी ठेवता येईल याबाबत सांगणार आहोत. आयुष मंत्रालयानंही आयुर्वेदीक पदार्थांचा वापर करून उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. मध आणि दालचीनी यांचे चूर्ण खाल्यानं रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. याशिवाय अनेक जीवघेण्या आजारांपासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो. मधा आणि दालचीनीच्या सेवन केल्यानं कोणकोणत्या आजारांपासून बचाव होतो जाणून घ्या.

पोटासाठी फायदेशीर : मधात दालचीनीची पूड एकत्र करून याचे चाटण तयार करा. हे चाटण एकत्र न संपवता हळू हळू सेवन करा.या गुणकारी चाटणामुळे घसा, फुफ्फुसांच्या आजारांपासून लांब राहता येतं याशिवाय पोटाच्या अल्सरची समस्या दूर होते.

कॅन्सरचा धोका कमी होतो : मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने, शरीरात कॅन्सर सेल्सची निर्मिती होण्यापासून रोखता येऊ शकतं. कॅन्सरचे सेल्स वाढण्याचा धोका कमी होतो.

त्वचेच्या समस्या दूर होतात :त्वचेवर पुळ्या येणं ही सामान्य गोष्ट असली तरी तोंडावर सतत पुळ्या आल्यानं संपूर्ण लूक बिघडतो. त्वचेवर गंभीर स्वरुपाचं संक्रमण होण्याची शक्यता असते. अनेकदा पोट व्यवस्थित साफ नसल्यामुळे पुळ्या येतात. एक्टिव्ह बॅक्टेरियांमुळे समस्या अधिक वाढत जाते. मध आणि दालचीनीचे दररोज सेवन केल्यानं या समस्येपासून आराम मिळू शकतो.

कॉलेस्ट्रॉल कमी होतं : बदलत्या जीवनशैलीत खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हृदयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. शरीरातील कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी पावडरचे पाणी अतिशय उपयोगी पडते. या पाण्याच्या सेवनाने हृद्यरोगाचा धोका टळतो.

युरीन इन्फेक्शनपासून बचाव : जर तुम्हाला वारंवार युरिन इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर तुम्ही दालचिनी आणि मधाचं सेवन केल्यास आराम मिळेल. महिलांना अनेकदा युरिन इन्फेक्शनची समस्या उद्भवते. आपल्या वैयक्तीक आरोग्याची काळजी घेण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या आणि मध आणि दालचिनीच्या चाटण घ्या. यामुळे ही समस्या तीव्रतेनं उद्भवण्यापासून रोखता येऊ शकतं.

आर्थरायटीसपासून बचाव : रोज रात्री झोपण्याआधी मधात दालचिनी मिसळून खा आणि त्यानंतर कोमट पाणी प्या. रोज हा उपाय केल्यानं सांधेदुखीची समस्या कमी होईल. याशिवाय रोज एक ग्लास मध आणि दालचिनी पावडरचे पाणी प्यायल्याने डोकेदुखी कमी होते.

कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढत आहे. दरम्यान आता कोरोनामुळे बिघडत असलेली परिस्थिती नियंत्रणांत आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पोस्ट कोविड-१९ मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी केले आहेत. या प्रोटोकॉलमध्ये रुग्णाच्या रिकव्हरी आणि सामुहिक स्तरावर विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही खास सल्लेही देण्यात आले आहेत.

घरात क्वारंटिन राहून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या या प्रोटोकॉलमधून काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा रुग्णांनी मास्क, हातांची स्वच्छता आणि रेस्पिरेटरी हायजीनची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे गांभीर्याने पालन केले पाहिजे.

तसेच योग्य प्रणाणात गरम पाण्याचे प्राशन केले पाहिजे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या औषधांचे सेवक करावे. तसेच प्रकृती साथ देत असेल तर घरगुती काम केले पाहिजे. तसेच ऑफिसचं कामही हळूहळू सुरू करा. यादरम्यान, लोकांनी हलका व्यायाम करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

याशिवाय प्रकृतीची काळजी घेताना रोज योगासने, प्राणायाम आणि मेडिटेशन करावे. तसेच श्वसनाचे व्यायाम करण्याचा सल्लाही देण्यात आले आहे. त्याबरोबरच शारीरिक क्षमतेनुसार रोज मॉर्निंग वॉक आणि इ्व्हिनिंग वॉक करावा. आपल्या पौष्टिक आहाराला बॅलन्स करावे. ताजे, शिजलेले आणि नरम भोजन सहज पचू शकते.

तसेच पुरेशी झोप आणि आराम यांचीही विशेष काळजी घ्यावी, मद्यपान आणि धुम्रपान करू नये. घरात राहून आपल्या आरोग्याचे चांगल्या पद्धतीने निरीक्षण करावे शरीराचे तापमान, रक्तदाब, ब्लड शुगर (मधुमेह असल्यास) आणि पल्स ऑक्सिमेट्रीची माहिती ठेवा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *