बोंबला ! ‘या’ भारतीय चाहत्याने कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी बनवला Mia khalifa चा टॅटू..स्वतः मियाने केला शेअर..

अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकारासाठी स्वतःचे प्रेम व्यक्त करताना सर्वच सीमा पार करतात. त्या सीमा पार करताना कधी ते काय करतील, याचा काहीच नेम नाही. आपल्या आवडत्या कलाकारांच्या नावाचे टी-शर्ट घालणे, त्यांचे पोस्टर लावणे, त्यांचे फोटोज आपल्या फोनमध्ये स्क्रीनसेव्हर म्हणून ठेवणे या गोष्टी अनेकजण करतात.
काही चाहते तर, आपल्या आवडीच्या कलाकारांचे मंदिर देखील बनवतात. त्या कलाकारांना देवासमान मानून त्यांची पूजा करणे, दुधाचा अभिषेक करणे हेदेखील आपण पहिले आहे. काही चाहते आपल्या आवडत्या कलाकारांचे टॅटू, आपल्या शरीरावर बनवून घेतात. अनेकजण आपल्या आवडत्या व्यक्तीचे टॅटू, आपल्या श’रीरावर बनवतात.
कोणत्याही व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याच्या चेहऱ्याचा टॅटू आपल्या श’रीरावर बनवणे म्हणजे, त्या व्यक्तीसाठी मनामध्ये आदर आणि प्रेम या दोन्ही गाष्टींची पराकाष्ठाच असते. त्यामुळे, जेव्हा कोणी एखाद्या व्यक्तीचे टॅटू बनवतात, तेव्हा त्या व्यक्तीसाठी मनात असलेलं प्रेम व्यक्त करत आहेत असं समजलं जात. आपल्या, पालकांच्या नावाचे, किंवा जोडीदाराच्या नावाचे टॅटू अनेकजण करतात.
काही जण आपल्या आवडत्या कलाकारांचे, खेळाडूंचे देखील टॅटू बनवतात. मात्र, एका भारतीय चाहत्याने तर कहरच केला. या चाहत्याने थेट, एका पॉ’र्नस्टारच्या चेहऱ्याचा टॅटू बनवला आहे. ‘Tattoo_artist_01’ नावाच्या इन्स्टाग्राम पेज असणाऱ्या, एका भारतीय टॅटू कलाकाराने त्याच्या अकाऊंटवर, एक खास व्हिडिओ अपलोड केला.
हा व्हिडिओ, टॅबलेट स्क्रीनवर मिया खलीफाच्या फोटोसोबत सुरू होतो. त्यानंतर, व्हिडियो मधील कॅमेरा टॅटूवरील फोम पुसणाऱ्या व्यक्तीकडे वळतो. फोम पुसल्यानंतर, मीया खलिफाच्या चेहऱ्याचा टॅटू दिसतो. हा व्हिडियो बघून, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वतः मिया खलिफाने देखील आपल्या इंस्टाग्रामवर या व्हिडियोची लिंक शेअर केली आहे.
मिया खलिफा, पॉ’र्न जगातील एक मोठं आणि लोकप्रिय नाव आहे. संपूर्ण जगभरात मियाचे कित्येक चाहते आहेत. आता मात्र मिया समाजकार्य देखील करत आहे. माघील वर्षी, बेरूत स्फो’टानंतर तिने आपल्या चष्म्याचा लिलाव केला होता. या चष्म्याची तब्बल ७३ लाख रुपयांची बोली लागली होती, आणि त्यातून आलेले पै’से तिने मदतकार्यासाठी दान केले. याव्यतिरिक्त तिने यापूर्वी तिच्या जवळच्या काही संस्थांना १ कोटी १७ लाख रुपये इतकी रक्कम दान केली.
ही रक्कम तिने तिच्या OnlyFans खात्यातून कमावली होती. व्हिडिओ शेअर करत मियाने त्यावर लिहिले आहे की, ‘प्लिज sike म्हणा… हे भ’यंक’र आहे.’ या व्हिडियोने मियाला देखील आश्चर्यचकित केले. त्या भारतीय फॅनने, मियाच्या चेहऱ्याचा टॅटू आपल्या पायावर बनवला आहे. या व्हिडियोवर ४० लाखांहून अधिक व्युव्हज आले आहेत. त्यासाठी देखील मियाने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.