बॉलीवूडच्या सगळ्या अभिनेत्रीहून अधिक सुंदर आणि हॉट दिसते दीपक चहरची बायको, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, काय…

बॉलीवूडच्या सगळ्या अभिनेत्रीहून अधिक सुंदर आणि हॉट दिसते दीपक चहरची बायको, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, काय…

ग्लॅमर म्हणलं की आपल्यापुढे सगळ्यात पहिले बॉलीवूडच्या सुंदरी उभ्या राहतात. आपल्या मनोरंजनसृष्टीमधील जवळपास सर्वच अभिनेत्री खूपच सुंदर आहेत. मात्र केवळ बॉलीवूडचं नाही तर मॉडेलिंग, राजकारण, संगीत, क्रीडा आणि बिझनेस जगात देखील अनेक सुंदरी आहेत.

क्रीडा जगात तर अनेक अशा खेळाडू आहेत, ज्याकेवळ आपल्या खेळामुळेच नाही तर त्यांच्या स्टाईल आणि फॅशन सेन्ससाठी देखील ओळखल्या जातात. अगदी असच काही आपल्या बिझनेस वर्ल्डच्या बाबतीत देखील बोलायला हरकत नाही. आपल्या उद्योग जगात देखील अनेक उद्योजिका कमालीच्या सुंदर आणि आपल्या खास लूकसाठी ओळखल्या जातात.

सध्या अशाच एका सुंदरीची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. क्रिकेटचा बॅकग्राऊंड आणि बिझनेस जगातील चांगलंच मोठं नाव असणाऱ्या या सुंदरीच नाव ‘जया भारद्वाज’ असं आहे. माघील आयपीएलच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स स्फोटक खेळाडू दीपक चहरने भर ग्राऊंडवर जयाला प्रपोज करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

त्यावेळी सर्वात प्रथम जया प्रकाशझोतात आली. दीपक चाहर मुळे जरी जया प्रकाशझोतात आली असली तरी तिची आपली खास ओळख आहे. भारतीय उद्योग विश्वात तिला चांगलंच ओळखलं जात. तिचा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज मनोरंजन सृष्टीमध्ये सक्रिय आहे. त्याने एमटीव्हीच्या काही रियालिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता.

त्याचबरोबर बिग बॉसमध्ये देखील तो झळकला होता. जया बद्दल अधिक बोलायचं झालं तर तिने मुंबई मधून मास कम्युनिकेशनची डिग्री घेतली आहे. स्टार टीव्ही नेटवर्क सारख्या मोठ्या वाहिनीसोबत काम करत तिने आपल्या करियरला सुरवात केली. त्यानंतर बीबीसी सारख्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क कंपनीसोबत तिने काही वर्ष काम केले.

भाऊ सिद्धार्थ सोबत ती काही मॅगेझिनच्या कव्हरवर देखील झळकली आहे. सध्या ती एअरटेल सोबत काम करत आहे. जया दिसायला कमालीची सुंदर आणि फिट आहे. आपल्या सोशल मीडियावर अकाउंट वरुन ती अनेक फोटोज शेअर करत असते. तिच्या स्टाईल, फॅशन आणि ग्लॅमरस लूकवर अनेकजण फिदा आहेत.

१ जूनला नुकतंच ती दीपक सोबत लग्नबेडीत अडकली आहे. भारताची लव्ह-कॅपिटल समजल्या जाणाऱ्या आग्रा येथे दीपक आणि जया या दोघांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आपली लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नात अगदी जवळचे काही मित्र आणि नातेवाईकच सहभागी झाले होते. त्याने दिल्लीमध्ये रिसेप्शन देखील दिले होते.

त्याच्या रिसेप्शनला भारतीय क्रिकेट संघाचे आणि चेन्नई सुपर किंग्सच्या अनेक सहकाऱ्यांनी आणि क्रिकेटपटूनी हजेरी लावली होती. व्हायरल होत असलेला व्हिडीओ दिपकने आपल्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. ‘क्रिकेटच्या पीचवर गोलंदाजी करण्यापेक्षा मी डान्स करताना अधिक दबावात होतो,’ असं कॅप्शन टाकत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दिपकचा डान्स बघून चाहते चांगलेच प्रभावित झाले. मात्र त्याहून अधिक त्याच्या पत्नीच्या डान्सच कौतुक सर्वजण करत आहेत. सर्वात पहिले या जोडप्याने ‘मिस्टर खिलाडी’ या गाण्यावरती डान्स केला. त्यानंतर त्याची पत्नी जया हिने ‘बोले चुडिया’ या गाण्यावर डान्स करत ठुमके लगावले.

यावेळी ती अगदी एखाद्या बॉलिवूड अभिनेत्री सारखी सुंदर दिसत होती. या कपलचा डान्स बघून दोघांनीही चित्रपटात काम करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे. यामध्ये दिपकची पत्नी कमालीची सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. तीच सौंदर्य बघून अनेकांनी तिला बॉलीवूडमध्ये जाण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.