बॉलिवूडवर शोककळा ! ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचं निधन, ‘होली’ सेलिब्रेट करू घरी आल्यानंतर…

बॉलिवूडवर शोककळा ! ‘या’ दिगग्ज अभिनेत्याचं निधन, ‘होली’ सेलिब्रेट करू घरी आल्यानंतर…

नुकतंच देशात सगळीकडेच होळीची धूम बघितली गेली आहे. यावेळी देखील सर्वानी रंगाच्या या सणाचा मनसोक्त आनंद लूटला. सर्व सामान्यांपासून ते सेलेब्रिटींपर्यंत होळीच्या सणाचा उत्साह बघितला गेला आहे. बॉलीवूडमध्ये तर अनेक जोडप्यांसाठी ही पहिली होळी आहे. त्यामुळे होळीच्या सणाची काही खास रंगत बघितली गेली.

ऐनवेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे या आनंदला गालबोट लावलं. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकाचं झालेलं नुकसान हा मोठा चिंतेचा विषय समोर आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच चिंता आणि दुःखाचे सावट पसरल्याचं बघितलं जात आहे. आणि आत त्यातच बॉलीवूडमधून अजून एक अत्यंत ध’क्कादायक बातमी समोर आली आहे.

एका दिग्गज सेलिब्रिटींचे निध’न झाल्याची वार्ता समोर आली आहे. काहीच दिवसांपूर्वी, प्रसिद्ध चित्रपट निर्माते नाझिम हसन रिझवी यांनी देखील अखेरचा श्वास घेतला होता. तर त्यापाठोपाठ, चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांचे देखील नि’धन झाले.

आणि आता एका लोकप्रिय सेलिब्रिटींच्या नि’धनाच्या बातमीने बॉलीवूड हादरलं आहे. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक आता आपल्यात राहिले नाही. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. सतीश कौशिक यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटात कॅलेंडरची व्यक्तिरेखा साकारली होती. याच खास भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली.

यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये साईड भूमिका साकारली. आपल्या दमदार अभिनयाने त्याने सर्वांच्या हृदयात स्थान निर्माण केले. ‘राम लखन’ आणि ‘साजन चले ससुराल’ या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. अलीकडेच ते कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात काम करत होते.

त्यांनी अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये देखील आपल्या खास शैलीने विनोदाचा तडाखा लगावला. त्यांच्या मृ’त्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यांचे मित्र अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दुःखद माहिती दिली आहे. अभिनेता असण्यासोबतच ते दिग्दर्शक, निर्माता, विनोदकार आणि पटकथा लेखक देखील होते.

त्यांच्या निध’नाच्या वृत्ताने हिंदी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. माहिती देताना अनुपम खेर यांनी ट्विट केले, ‘मला माहित आहे की “मृ’त्यू हे या जगाचे शेवटचे सत्य आहे!” पण मी माझ्या जिवलग मित्र #SatishKaushik बद्दल हे लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम!! तुझ्याशिवाय आयुष्य कधीच सारखे होणार नाही, सतीश. ओम शांती.’ दरम्यान, सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. 1972 मध्ये त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अँड फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथेही शिक्षण घेतले.

1983 मध्ये ‘जाने भी दो यारों’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. सतीश कौशिक यांनी 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 1993 मध्ये त्यांनी ‘रूप की रानी, चोरों का राजा’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपली इनिंग सुरू केली आणि त्यानंतर डझनभर चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

विशेष म्हणजे, सतीश कौशिक यांचे शेवटचे ट्विट ७ मार्च रोजी होते. होळी पार्टी करून तो खूप आनंदित झाला आणि होळीमध्ये सामील असलेल्या लोकांना खास टॅग केले. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना आणि बॉलीवूड सेलिब्रिटींना देखील मोठा धक्का बसला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *