बाबो ! RRR प्रदर्शित होण्याआधीच राम चरणने वाढवली फी, बनला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता?

बाबो ! RRR प्रदर्शित होण्याआधीच राम चरणने वाढवली फी, बनला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता?

बॉलीवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत की जे कोट्यवधी रुपये मानधन घेतात. यामध्ये अजय देवगन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यासारख्या कलाकारांचा समावेश होतो. हे कलाकार जवळपास 70-80 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गेल्या काही वर्षापासून हा ट्रेंड आता बदलत आहे.

अनेक कलाकार आता स्वतःची निर्मिती सुद्धा करत आहे. तसेच चित्रपट तयार होताना त्यात आपला हिस्सा किती यावर देखील आधीच ठरवतात. त्यामुळे मानधनाचा अभिनेत्यांना काहीही फरक पडत नाही. गेल्या काही वर्षापासून बॉलिवूडमध्ये जो अभिनेता चित्रपट करतो तो चित्रपटात 50 टक्के हिस्सा घेतो. त्यामुळे चित्रपट जरी फ्लॉप झाला तरी त्याला फायदा राहतो.

तसेच रजनीकांतचे चित्रपट ही ॲक्शन भरलेले असतात. दक्षिणेत सध्या विजय हा सुपरस्टार असून त्याचे आणि चित्रपट हिट असल्याचे पाहायला मिळते. रजनीकांत यांनी त्यांच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या दरबार या चित्रपटासाठी तब्बल 90 कोटी रुपये मानधन घेतले होते.. दक्षिण भारतामध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात येते.

यामध्ये अनेक मराठी अभिनेत्यांनी आपले नशीब आजमावले आहे. मराठीत एखादा कलाकार भेटला की दक्षिणेत तो पैसे कमवण्यासाठी जातो. अशोक सराफ यांच्यापासून अनेक कलाकारांनी दक्षिणेत आपले नशीब आजमावले आहे. सयाजी शिंदे यांनी तर दक्षिणमध्ये आपले नाव खूप कमावले आहे. असेच आणखी काही अभिनेते देखील दक्षिणेत चित्रपट करून वाहवा मिळवत आहेत.

दरम्यान, ‘आरआरआर'(RRR) या चित्रपटामुळे अभिनेता राम चरण सध्या चर्चेत आहे.‘आरआरआर’ (RRR) हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. पण त्याआधीच या चित्रपटात एक मुख्य भूमिका साकारणारा राम चरण याचे भाव वाढले आहेत. होय, साऊथ सुपरस्टार राम चरण सर्वाधिक महाग अभिनेत्यांच्या यादीत सामील झाला आहे. ‘आरआरआर’ या एस. एस. राजमौली यांच्या सिनेमासाठी राम चरणने 45 कोटी रूपये चार्ज केल्याचे कळते.

पण आता त्याच्या मानधनाचा आकडा एकदम दामदुप्पट झाला आहे. होय, एका रिपोर्टनुसार ‘आरसी 15’ आणि ‘आरसी 16’ या दोन्ही सिनेमांसाठी राम चरणने प्रत्येकी 100 कोटी रूपये फी घेतली आहे. या चित्रपटात रामचरण बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.

‘आरआरआर’नंतर रामचरण प्रचंड डिमांडमध्ये आहे. निर्माते त्याला अधी मागेल ती रक्कम द्यायला तयार आहेत. तसेही रामचरणने आत्तापर्यंत अधिकाधिक हिट सिनेमे दिले आहेत. अभिनेता राम चरण हा प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. मात्र तरीही राम चरणने मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली. तुमच्या अंगी कला असेल तर यश, पैसा आणि प्रसिद्धी नक्की मिळते, हेच राम चरणनेही सिद्ध करून दाखवलं.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.