बाटलीबंद पाणी विकणारा ‘हा’ चिनी व्यवसायिक देतोय मुकेश अंबानीला टक्कर, पहा दोघांसंपत्ती मध्ये आहे केवढ एवढा फरक…

वर्षाच्या शेवटच्या महिन्यांत मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकाच्या दहा क्रमांकामध्ये नाहीत, अशी बातमी समोर आली आहे. ब्लूमबर्ग अब्ज अब्जाधीश निर्देशांकानुसार मुकेश अंबानी जगातील सर्वात श्रीमंत यादीत 11 व्या स्थानावर आहेत. मात्र त्यांना एक चीनी व्यावसायिक चांगलीच टक्कर देत आहे.
मुकेश अंबानींच्या या क्रमवारीतही अडचणीचा सामना करावा लागत आहे. या जागेसाठी मुकेश अंबानी हे चीनी व्यावसायिक झोंग शशानशी स्पर्धा करीत आहेत. ब्लूमबर्ग अब्ज अब्जाधीश निर्देशांकानुसार, चीनच्या अब्जाधीश झोंग शशानकडे एकूण 76.7 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. अब्जाधीशांच्या क्रमवारीत शशान 12 व्या स्थानी आहे.
त्याचवेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्याकडे 76.9 अब्ज डॉलर्स आहे. तुलना केली तर दोघांच्या संपत्तीमध्ये फारच थोडा फरक आहे. पण मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण झोंग शशान हे आता अंबानीला चांगलीच टक्कर देत आहेत.
चिनी अब्जाधीश झोंग शशान हे बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करतात. पूर्वी ते एका बांधकाम कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. त्यानंतर नोंगफूची स्थापना 1996 मध्ये झाली. त्यांची बाटलीबंद पाण्याची नोंगफू कंपनी ही चीनी बाजारात आघाडीची कंपनी आहे.
या कंपनीने यावर्षी हाँगकाँग देशात विक्रमी सेल केला होता. तेव्हापासून, साठा प्रचंड वाढला आहे. 66 वर्षीय झोंग हे एप्रिल 2020 मध्ये शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेल्या बीजिंग वेई बायोलॉजिकल फार्मसीवरही नियंत्रण ठेवतात. त्यांची कंपनी एका नामांकित विद्यापीठाच्या सहकार्याने कोविड -19 लस देखील विकसित करीत आहे.
लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन अब्जाधीश मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. पण, गेल्या काही दिवसांमध्ये रिलायन्सच्या शेअर्समध्ये घट झाल्याचा परिणाम अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर झाला आहे.
दुसरीकडे, प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार वॉरेन बफेट पुन्हा एकदा पाचव्या स्थानी आले आहेत. 95.5 अब्ज डॉलर इतकी त्यांची संपत्ती झाली आहे. 22 जुलै रोजी वॉरेन बफेट यांना मागे टाकत मुकेश अंबानी यांनी पाचव्या स्थानी झेप घेतली होती. त्यावेळी त्यांची संपत्ती 75.1 अब्ज डॉलर इतकी होती, तर बफेट यांची संपत्ती 72.7 अब्ज डॉलर इतकी होती.
फोर्ब्सच्या जगातील टॉप-15 श्रीमंतांच्या यादीमध्ये केवळ मुकेश अंबानी एकमेव आशियातील व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस 190 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह अव्वल स्थानी कायम आहेत. तर, माइक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स 114 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.