बहिणीच्या लग्नाला येण्यापूर्वीच सैन्यातील भावाला आले वीरम’रण, भावाच्या शंभर कमांडो मित्रांनी बहिणीच्या लग्नात जे केले ते वाचून चकित व्हाल..

बहिणीच्या लग्नाला येण्यापूर्वीच सैन्यातील भावाला आले वीरम’रण, भावाच्या शंभर कमांडो मित्रांनी बहिणीच्या लग्नात जे केले ते वाचून चकित व्हाल..

आपण ज्यावेळेस सण-उत्सव साजरे करत असतो, त्यावेळेस भारतीय सीमेवर आपले रक्षण करत असलेले जवान आपले बंधू हे जीवाची बाजी लावत असतात. त्यामुळे आपण इकडे चांगल्याप्रकारे सण-उत्सव साजरे करत असतो. नुकताच दिवाळीचा सण साजरा होऊन गेला. मात्र, अनेक सै’निकांना दिवाळीला आपल्या घरी येता आले नाही.

याचे वेगळे कारण असण्याची आपल्याला सांगण्याची गरज नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या जवानांचे कौतुक करत त्यांच्या सोबत दिवाळी साजरी केली. त्यांना मिठाई देखील भरवली. अनेकदा लष्करात काम करत असलेल्या जवानांना आपल्या घरी हा उत्सव किंवा एखाद्याचे लग्न असले तरी त्यांना येता येत नाही. अनेकजण सुट्टी मिळवण्याचा प्रयत्न करतात.

मात्र, त्यांना सुट्टी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या पश्चात लग्न झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आम्ही आपल्याला एका अशाच घ’टनेबाबत माहिती देणार आहोत. या घ’टनेमध्ये एका भावाला त्याच्या बहिणीच्या लग्नात पोहोचता आले नाही. त्याआधीच त्याला वीरम’रण आले. मग त्यानंतर तब्बल 100 कमांडो या लग्नात पोहोचले. त्यानंतर काय झाले हे आपण पाहूया.

बिहार येथे राहणारा हा भारतीय लष्करतील एक जवान आहे. गेल्या काही वर्षापासून तो देशासाठी सेवा देत आहे. बिहार येथील येथील एका गावात राहणारे तेज नारायण सिंह यांची मुलगी शशिकला हिचे लग्न होते. या लग्नाची खूप तयारी देखील झाली होती. या लग्नासाठी तिचा भाऊ ज्योति प्रकाश निराला यांनी खुप स्वप्न रंगवली होती. ते भारतीय लष्करात कार्यरत आहेत. मात्र, लग्नात येण्यापूर्वीच त्यांना वीरम’रण आले.

ज्योति प्रकाश निराला हे बांधीपुरा येथे कर्तव्यावर होते. याच वेळी द’हश’तवा’द्यांची फा’यरिं’ग सुरू झाली. यामध्ये त्यांनी दोन द’हश’तवा’द्यांना कं’ठस्नानी पोहोचवलं. याचबरोबर त्यांनी चकमकीमध्ये आपल्या सहकार्‍यांचा जी’व देखील वा’चवला. मात्र, त्यांना वीरम’रण आले. ही बातमी जेव्हा त्यांच्या वडिलांना समजली. त्यावेळेस ते खूपच चिंतीत झाले. एकीकडे मुलीचे लग्न तर एकीकडे मुलाचे वीरम’रण अशा वेळेस त्यांना काय करावे, ते समजत नव्हते.

त्यांना मुलाची कमतरता देखील भासत होती. ज्योती प्रकाश यांची बहीण शशिकलाचे लग्न सुजित कुमार याच्याशी ठरले होते. मात्र, ज्योती प्रकाश‌ हे शहीद झाल्याने या लग्नामध्ये तब्बल शंभर कमांडो सहभागी झाले. त्यानंतर बिहारी परंपरेनुसार ज्यावेळेस मुलीची विदाई होत असते, त्यावेळेस अनेक जण आपले हात समोर ठेवत असतात.

त्यावरून वधु ही चालत जाते, अशा वेळेस शंभर कमांडो तेथे दाखल झाले आणि त्यांनी आपले हात समोर केले आणि शशिकला हिला विदाई करून ज्योती प्रकाश यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. हा प्रसंग अतिशय भावुक करणारा होता. ज्योती प्रकाशचे वडील म्हणाले की, शंभर कमांडो या लग्नामध्ये आले. त्यामुळे माझ्या मुलाची कमतरता मला अजिबात भासली नाही.

शंभर कमांडोंनी माझा मुलाची कमतरता भरून काढली. ज्योती प्रकाश हे अशोक चक्राने सन्मानित असे कमांडो होते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना अशोक चक्र प्रदान केले होते. या घटनेची सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. एका व्यक्तीने म्हटले आहे की, एका बहिणीने आपला एक भाऊ गमावला, तर त्यानंतर तिला लगेचच शंभर भाऊ मिळाले. ज्योती प्रकाश यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.