बऱ्याचदा अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा का लपवतो ? जाणून घ्या त्यामागचे ‘हैराण’ करणारे कारण

बऱ्याचदा अक्षय कुमार त्याच्या मुलीचा चेहरा का लपवतो ? जाणून घ्या त्यामागचे ‘हैराण’ करणारे कारण

अक्षय कुमारचा एक चित्रपट आला होता खिलाडिय़ों का खिलाड़ी त्यात एक गाणे होते… अरे ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो के बच्चे, हम है सिधे सादे अक्षय…. हे गाणे त्याच्या वास्तविक जीवनाशी खूप जुळणारे आहे. असे म्हटले जाऊ शकते की अक्षय कुमार बॉलीवूडमधील एक आगळा वेगळा अभिनेता आहे.

जिथे इतर अभिनेते संपूर्ण रात्री जागून पार्टी करतात … पार्टीत डान्स, गाणे … म द्यपान करतात, तिथे अक्षय हा घरात रात्रीच्या पार्ट्याला न जाता शांत झोप घेतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की खऱ्या आयुष्यात अक्षय ना दारू पितो ना सिगारेट.

पहाटे पाच वाजता बेड सोडतो म्हणजे झोपेतून उठतो. यावेळी बैठका आणि मुलाखती तो करतो. आज जिथे सोशल मीडियाचा संपूर्ण युग वेडा आहे … तिथे अक्षय त्यावर आवश्यक तेवढेच लक्ष देतो. बिनकामी तो ना ट्विटर वर येतो ना इंस्टाग्राम ना फेसबुक वर….

सर्वात मजेची गोष्ट म्हणजे त्याची मुले सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर आहेत.अक्षय कुमार हा बॉलिवूडचा अव्वलचा अभिनेता आहे आणि कोट्यावधी लोक त्याचे चाहते आहेत पण जेव्हा तो घरी जातो तेव्हा घरात तो फक्त एक नवरा आणि वडील म्हणून वावरत असतो. ते एक सामान्य जीवन जगतो आणि प्रत्येक विवाद घरापासून दूर ठेवतो.

अक्षय त्याच्या कुटुंबासाची किती काळजी घेतो हे कोणी त्याच्याकडून शिकावे. तो केवळ मुलगा आरव याला सोशल मीडियापासून दूर ठेवत नाही तर मुलगी नितारा हीला सुद्धा मीडियापासून लपवून ठेवतो. निताराची छायाचित्रे तुम्ही बर्‍याचदा पाहिली असतील, परंतु चेहरा कधीच नीट पाहिला नसेल, कारण जेव्हा जेव्हा खिलाडी अक्षय कुमार मीडियाच्या समोर येतो तेव्हा तो निताराचा चेहरा लपवतो.

तो पटकन तिच्या चेहऱ्यायावर हात ठेवतो जेणेकरून कोणालाही निताराचा चेहरा दिसणार नाही किंवा एखादा फोटोही काढता येणार नाही.जेव्हा जेव्हा अक्षय आणि ट्विंकल आपल्या मुलीचे चित्र सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्या फोटोत मुलीचा चेहरा कधीच दिसत नाही. एकतर निताराचा मागचा भाग दिसत असतो किंवा थोडासा चेहरा दिसत असतो. संपूर्ण चेहरा कधीही दिसत नाही.

आता प्रश्न असा पडतो की अक्षय हे असं का करतो?

तर यामागे असे कोणतेही खास कारण नाही परंतु अक्षय आपल्या मुलीसाठी खूप सकारात्मक (पजेसीव) आहे. त्याला माहिती आहे की माध्यम हे कधीकधी किती वाईट बनतात आणि लहान लहान गोष्टी मोठ्या मोठ्या करून आपल्या समोर मांडतात. अमिताभ बच्चन यांची नात नव्या किंवा शाहरुखचा मुलगा आर्यन खान, सैफची मुलगी सारा किंवा अभिषेकची लाडकी आराध्य मीडियावर या सर्वांच्या संबंधित बातम्या देत असते.

या बातम्यांमुळे बर्‍याचदा त्यांच्या मुलांचे वैयक्तिक जीवन कसे आहे हे मीडिया सांगत असते. शाहरुखची मुलगी आणि अमिताभची नात नव्या यांच्यासोबत जे घडले त्याप्रमाणे निताराबाबत असे काहीही घडू अशी अक्षयची इच्छा नाही. जेव्हा नितारा मोठी होईल, तेव्हा अक्षय तिला मीडियासमोर आणेल.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *