प्रसुतीनंतरही महिलेच्या पोटात होऊ लागल्या असहनीय वेदना! तपासणीमधून धक्कादायक प्रकार आला उघडकीस…

डॉक्टरांना सगळीकडेच देव म्हणून पूजिले जाते. अनेक संकटांच्या वेळी आपण पहिले आहे की, डॉक्टर धावून आले आणि रुग्णांचे प्राण वाचले. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे देखील अनेक किस्से आपण रोज ऐकतो. कधी देव बनून प्राण वाचविणारे डॉक्टर आपल्या चुकीमुळे रुग्णाचे प्राण देखील धो’क्यात टाकतात.
रुग्णाचे नातेवाईक मोठ्या आशेने आणि विश्वासाने डॉक्टरांकडे नजरा लावून बसलेले असतात. मात्र डॉक्टरांच्या एका चुकीमुळे कुटुंबियांच्या आशा, विश्वास सर्व काही उ’ध्व’स्त होते. कधी योग्य पैसे नाही मोजले म्हणून तर कधी चुकीची ट्रीटमेंट अशा कारणांमुळं अनेक ध’क्का’दा’यक प्रकार आपल्या समोर येतात.
असाच एक अत्यंत ध’क्का’दायक प्रकार ठाण्यामधून समोर आला आहे. एका मोठ्या आणि नामांकित अशा रुग्णालयात अशा प्रकारचा हलगर्जीपणा घडला, यामुळे संपूर्ण परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर संबंधित महिला आपल्या घरी गेली.
मात्र त्यानंतर तिच्या पोटात अ’सह’नीय अशा वेदना सुरु झाल्या. काही केल्या या वेदना थांबेना म्हणून तिने त्वरित रु’ग्णालय गाठले. त्यावेळी समोर आलेल्या प्रकारामुळं, महिलेच्या आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. या महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिलं असलायचा प्रकार उघडकीस आला.
ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिच्यावर दुसरी श’स्त्र’क्रिया करावी लागली. या श’स्त्र’क्रियेच्या वेळी तिच्या पोटातून कपडा निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नामांकित रुग्णालयाच्या डॉक्टरसह चार जणांच्या विरोधात ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर परिसरात ज्युपिटर हे नामांकित रुग्णालय आहे. याच रुग्णालयात 31 वर्षांच्या मृण्मयी दिवेकर बाळंतपणासाठी भरती झाल्या होत्या. सिझेरियन पद्धतीने त्यावेळी मृन्मयी यांची प्रसूती करण्यात आली. मात्र सिझेरियन झाल्यानंतर मृन्मयी यांच्या पोटात दुखू लागले.
वेदना असह्य होऊ लागल्या. म्हणून त्यांनी ही बाब सर्जन डॉक्टर अशुतोष आजगावकर यांच्या वारंवार निदर्शनात आणून देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र आजगावकर यांनी उलट औषध उपचार करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना या वेदना होत आहेत असा आरोप केला.
मात्र वेदना खूप जास्त वाढल्या आणि त्रास सहनच होत नसल्यामुळं महिलेची दुसरी श’स्त्र’क्रि’या करण्यात आली. या श’स्त्र’क्रि’येदरम्यान समोर आले त्याने सर्वांनाच ध’क्का दिला. सिझेरियन करताना डॉक्टरने योग्य ती दक्षता घेतली नाही आणि निष्काळजीपणा केल्यामुळे चक्क महिलेच्या पोटामध्ये कापडी मॉप राहिलेले आढळून आले.
श’स्त्र’क्रि’ये’दरम्यान पोटात राहिलेल्या या कपड्यामुळे संबंधित महिलेच्या पोटामधील आतडी, अंडाशय तसंच अंडाशयाची उजवी नळी चिकटून गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याचे निदान झाले. परिणामी, या दुसऱ्या श’स्त्र’क्रि’ये’दरम्यान मृण्मयी यांच्या उजव्या बाजूची अंडाशयाची नळी काढून टाकावी लागली.
केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि नि’ष्का’ळजीपणामुळं हा घडला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, वेळीच श’स्त्र’क्रि’या करून निदान झाले नसते तर हा प्रकार मृण्मयी यांच्या जीवावर बेतलं असता. या प्रकरणी मृण्मयी दिवेकर आणि त्यांच्या कुटूंबियांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्याच पार्श्वभूमीवर, रुग्णालयाचे प्रसूती करणारे सर्जन डॉ. आशुतोष आजगावकर, असिस्टंट सर्जन डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ञ डॉ. चिन्मयी गडकरी आणि ऑपरेशन थेटर मधील नर्स असा चार जणांच्या विरोधात भादवी कलम ३०८, ३४ प्रमाणे गु’न्हा दाखल केला आहे. वर्तकनगर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
‘बाळाच्या हृदयाचे ठोके झपाट्याने कमी होत होते. त्यामुळे रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. आई आणि बाळाचे प्राण वाचवण्यासाठी तातडीची सिझेरियन श’स्त्र’क्रि’या करण्यात आली. बाळाचा जन्म झाल्यानंतर, रुग्णाला अति र’क्त’स्त्रा’व झाला.
त्यामुळे र’क्त’स्त्रा’व व्यवस्थापित करण्याकरिता आणि हिस्टेरेक्टॉमी/ गर्भाशय काढून टाकणे प्रतिबंधित करण्यासाठी आ’प’त्का’लीन उपाय करण्यात आले होते. तत्परतेने आणि वेळीच कारवाई केल्यामुळे बाळ आणि आई दोघांचेही प्राण वाचले,’ असे ज्युपिटर रुग्णालयातील व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.