प्रसिद्ध अभिनेते ‘सदाशिव अमरापूरकर’ यांचे ‘जावईबापू’ आहेत दिग्गज सेलिब्रिटी, झी मराठी वरील…

प्रसिद्ध अभिनेते ‘सदाशिव अमरापूरकर’ यांचे ‘जावईबापू’ आहेत दिग्गज सेलिब्रिटी, झी मराठी वरील…

सदाशिव अमरापुरकर मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीच नाव. सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी सोबत हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने सगळ्यांची मन जिंकली. अमरापुरकर यांनी विनोदी, चरित्र, खलनायक अशा सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या होत्या.

सदाशिव अमरापूरकर यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मात्र, आजही ते आपल्या स्मरणात आहेत. सदाशिव अमरापुरकर यांचा जन्म 11 मे 1950 रोजी नगर जिल्ह्यामध्ये झाला. अमरापूरकर यांचे खरे नाव गणेश कुमार नरवाडे असे होते. मात्र, त्यांनी नंतर हे नाव बदलले.

अमरापूरकर यांनी मराठी नाट्य, हिंदी, ओडिया, हरियाणी, भोजपुरी, बंगाली, गुजराती यासारख्या भाषांमध्ये काम केले होते. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले. नगरच्या शेवगाव तालुक्यातील अमरापुर हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील हे शेती करायचे. अमरापुरकर यांनी देखील बालपणी या सगळ्या गोष्टी केल्या.

अमरापुरकर यांच्याकडे जवळपास शंभर शेळ्या होत्या. रोज शेळ्या चरायला नेण्याचे काम त्यांच्याकडे होते. त्यानंतर ते आळंदीला आपल्या आत्याकडे राहायला आले. यानंतरच त्यांच्या चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात झाली. अभय बंग, बाबा आढाव, नरेंद्र दाभोलकर यासारख्या समाजसेवकांसोबत देखील अमरापुरकर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

अमरापूरकरांनी श्याम बेनेकर यांच्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका साकारली होती. यांचा अर्धसत्य हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.

अमरापूरकर यांना सडक या चित्रपटासाठी तृतीय पंथी खलनायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील त्यांची महारानी ही भूमिका ही प्रचंड गाजली होती. दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी आपल्या अभिनयाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. अमरापूरकर यांचे जावई देखील एक दिग्गज शेफ आहे.

अनेक मराठी कलाकारांच्या घरी ते सर्व्हिस देत असतात. सदाशिव अमरापुरकर यांच्या जावयाचे नाव देवव्रत जातेगावकर असे आहे. झी मराठीवरील आम्ही सारे खवय्ये या शोमध्ये देवव्रत हे झळकले होते. या शोमध्ये देवव्रत यांच्या अंगी असलेले सर्व गुण आपल्याला पाहायला मिळाले होते.

त्यांनी बनवलेल्या पदार्थाची चव अतिशय उत्कृष्ट होती, असे सांगण्यात येत होते. ते अतिशय जबरदस्त कुक आहेत. 2012 मध्ये जातेगावकर यांनी भारताला रोप्य पदक मिळवून दिले होते. ही स्पर्धा जर्मनीमध्ये झाली होती. सदाशिव अमरापूरकर यांना तीन मुली आहेत. त्यांचे नाव केतकी, सायली आणि आणि निमा अशी आहेत. केतकी आणि देवव्रत यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झालेले आहे. सदाशिव अमरापुरकर आणि त्यांच्या जावयामध्ये खूप चांगली संबंध होते, असे देखील सांगण्यात येते.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.