प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? करा घरगुती सोपे उपाय

प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? करा घरगुती सोपे उपाय

कुटुंबासोबत, मित्रांसोबत सहलीला जायला प्रत्येकालाच आवडतं. लहान मुलं तर नेहमीच प्रवासाला उत्सुक असतात. मात्र लांब पल्ल्याचा प्रवास म्हंटल की अनेकांना ध-डकी भरते. याचं प्रमुख कारण म्हणजे प्रवासादरम्यान होणारा मळमळ आणि उ-ल्टीचा त्रा-स. एसटीनं, ट्रेननं किंवा अगदी स्वतःच्या गाडीनं प्रवास करताना अनेकांना हा त्रा-स होतो. अनेक लोकं अक्षरशः डोळे लावून संपूर्ण प्रवास करतात.

हा त्रास होऊ नये म्हणून काही जण निरनिराळ्या प्रकारचे औषधं घेतात. मात्र आता घाबरू नका. घरघुती उपाय केल्यामुळे तुम्ही या मळमळ आणि उ-ल्टीच्या त्रा-सापासून मुक्तता मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत.

हे उपाय करा –

बर्फाचा तुकडा :- जर आपल्याला प्रवासादरम्यान उलटीचा त्रास होत असेल तर आपण बर्फाचा तुकडा किंवा थंड पाणी प्यावे. यामुळे काही प्रमाणात आपल्याला उलटीचा त्रास हा कमी होतो. प्रवासादरम्यान बर्फाचा तुकडा उपलब्ध होत नाही. मात्र, आपण जर एसटीने प्रवास करत असाल तर घरातूनच असे बर्फाची तुक डा आइस पॉट मध्ये घेऊन जावेत. म्हणजे आपल्याला जेणेकरून हा त्रास होऊ नये.

क्रेकर्स :- अनेकदा आपल्या प्रवासात त्रास होतो. त्यानंतर आपल्याला भूक देखील लागते. त्यानंतर आपण क्रेकर्स हे खावे. बिस्किट प्रमाणे असणारे क्रेकर्स हे आपल्या शरीरात थंडावा निर्माण करतात. त्यामुळे आपल्याला पुन्हा उलटीचा त्रास होत नाही.

तिखट खाणे टाळावे :- जर आपण प्रवास करणार असाल तर निघण्याआधी आपण जेवण करत असता. मात्र, प्रवासादरम्यान आपण जेवणार असाल तर तिखट, खारट खाऊ नये. यामुळे आपल्याला उलटी चे निमंत्रण मिळते आणि प्रवासात मळमळ होऊ लागते. त्यानंतर उलटी होते. त्यामुळे प्रवासात निघण्याआधी किंवा प्रवासादरम्यान तिखट खारट खाऊ नये. फळांचे सेवन करावे. यामुळे आपल्याला उलटी टाळता येऊ शकते.

संत्र्याचा रस :- आपल्याला प्रवासादरम्यान उलटी होत असेल तर आपण घरून निघतांना संत्र्याचा रस करून सोबत घ्यावा आणि आपण प्रवास सुरू करताना संत्र्याचा रस थोडा थोडा घ्यवा. यामुळे आपल्याला उलटीचा त्रास होणार नाही. जर आपल्याला जवळ संत्र्याचा रस नसेल तर प्रवासादरम्यान संत्री कुठेही उपलब्ध होतात. नुसते खाल्ले तरी चालेल. यामुळे आपल्याला त्रास कमी होतो.

भात :- जर आपल्याला प्रवासाचा त्रास होत असेल तर आपण घरून निघताना सोबत भात आणि साजूक तूप घ्यावे. उलटी होत असल्याचे वाटत असल्यास भात आणि साजूक तूप खावे. यामुळे आपली उलटी काहीप्रमाणात थांबते आणि आपल्या पोटाला आराम मिळू शकतो. वरील उपाय आपण करू शकता. याशिवाय आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या देखील घेऊ शकता.

केळी :- केळीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर असते. जर आपल्याला उलटी होईल असे वाटत असेल तर आपण तातडीने केळी खायला पाहिजे. प्रवासादरम्यान केळी ही सहज उपलब्ध होते खेळीमुळे तुमची उलटी थांबवता येऊ शकते. त्यामुळे प्रवास करताना केळी जवळ ठेवावी. त्यामुळे उलटीचा त्रास आपल्याला होणार नाही.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *